Nagpur News: चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर ओपन कास्ट कोळसा खाण परिसरातील मसाळा (तुकुम) गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गावातील अधिकृत असलेल्या २८८ घरांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया नेमकी कुठवर आली आहे, याची सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वेस्टर्न कोल्डफिल्ड लिमिटेडला (डब्लूसीएल) दिले आहेत..खाणीसाठी चार गावांची जमीन संपादित करण्याचा निर्णय असताना प्रत्यक्षात फक्त तीनच गावांचे पुनर्वसन करण्यात आल्याने सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मेश्राम यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अनिल किलोर व न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली..Bhojapur Rehabilitation: भोजापूर येथील रहिवाशांचे पुनर्वसन करा.याचिकेनुसार, दुर्गापूर ओपन कास्ट कोळसा खाणीसाठी सिनाळा, नवेगाव, मसाळा (जुना) आणि मसाळा (तुकुम) या चार गावांचा समावेश करून पर्यावरण मंजुरी घेण्यात आली होती. मात्र, मसाळा (तुकुम) वगळता उर्वरित तीन गावांची जमीन संपादित करून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. गेल्या पाच वर्षांपासून मसाळा (तुकुम) गावातील नागरिक पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत..Village Rehabilitation: मसाळा गावातील केवळ २८८ घरांचेच पुनर्वसन शक्य .डब्लूसीएलने सुरुवातीला नियमांचा हवाला देत पुनर्वसनाची जबाबदारी नाकारली होती. मात्र, पर्यावरण मंजुरीच्या कागदपत्रांत चारही गावांचा स्पष्ट उल्लेख असल्याचे याचिकाकर्त्यांतर्फे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यानंतर, गावातील एकूण ६२६ घरांपैकी वैध ठरलेल्या २८८ घरांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय डब्लूसीएलने घेतल्याचे सांगण्यात आले. उर्वरित घरे अतिक्रमणात असल्याचा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे..बुधवारी झालेल्या सुनावणीत या २८८ घरांच्या पुनर्वसनाबाबत प्रत्यक्षात कोणती कार्यवाही झाली, याबाबत न्यायालयाने स्पष्ट माहिती सादर करण्याचे निर्देश डब्लूसीएलला दिले. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. शिल्पा गिरटकर, तर डब्लूसीएलतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ आनंद जयस्वाल यांनी बाजू मांडली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.