Western Ghat Rain Update: राज्यात मुंबईसह कोकण, पुणे, अहिल्यानगर, गडचिरोली, गोंदियाच्या काही भागांत, विशेषत: पश्चिम घाटावर मॉन्सूनने चांगलाच जोर पकडला आहे. रविवारी (ता. ५) राज्यात तब्बल २७४ महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली असून, उरण येथे ३४२ मिमी पावसाची सर्वाधिक नोंद झाली आहे. सलग दोन दिवसांपासूनच्या मुसळधारेने नद्या-ओढे प्रवाही झाले असून, धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू झाली आहे. खानदेश, मराठवाडा व विदर्भात अधूनमधून सरी बरसत आहेत. .कोकणात सर्वाधिक नोंदकोकणात रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीची तीव्रता सर्वाधिक दिसून आली. वावोशी, खोपोली, खालापूर आणि पनवेल या मंडलांत मुसळधार पावसाची नोंद झाली. अलिबाग परिसरातही २२० मिमीच्या आसपास पाऊस पडला. ठाणे जिल्ह्यात मुंब्रा, अंबरनाथ आणि शहापूर भागांत २०० ते ३०० मिमी दरम्यान पावसाची नोंद झाली. भिवंडी व वाडा परिसरातही मध्यम ते जोरदार सरी बरसल्या. रत्नागिरी जिल्ह्यात खेड, दापोली, चिपळूण आणि देवरूख भागांत १२५ ते १८० मिमी पावसाची नोंद झाली असून, नदी-नाले प्रवाही झाले आहेत. धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्याने जलसाठ्यात सुधारणा होत आहे..मध्य महाराष्ट्र, घाटमाथ्यावर जोरघाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक आहे. पुणे जिल्ह्यात मावळ आणि मुळशी पट्ट्यात पावसाचा जोर कायम राहिला. लोणावळा येथे २१९.५ मिमी, आंबवणे येथे २५३ मिमी, कुसगाव येथे २१९ मिमी आणि वडगाव मावळ परिसरात सुमारे १७२ मिमी पावसाची नोंद झाली. तसेच शिवणे येथे १५२ मिमी आणि टाकवे खुर्द येथे १२२ मिमी पाऊस झाला. या पावसामुळे पवना व मुळशी धरण क्षेत्रात पाण्याची आवक सुरू झाली असून, पाणीपातळीत वाढ होत आहे..Maharashtra Rain Forecast: राज्यात ९ जुलैपर्यंत पावसाला पोषक स्थिती .भात लागवडीसाठी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून काही भागात रोप लावणीची लगबग वाढली आहे. तर सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात अधूनमधून तुरळक सरी बरसत आहेत. सोलापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी राहिला. इतर भागांत ऊन-ढगांच्या खेळात तुरळक सरी पडल्या. कमी पावसामुळे पेरणी व पिकांच्या वाढीवर परिणाम जाणवत असून शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत..पूर्व विदर्भात पाऊसविदर्भात गोंदिया जिल्ह्यात कावराबांध येथे १०१ मिमी, गंगाझरी ९१ मिमी आणि सालेकसा ८२ मिमी पावसाची नोंद झाली. गडचिरोली जिल्ह्यातही काही भागांत मध्यम पाऊस झाला असून नद्या प्रवाही झाल्या आहेत. अमरावती, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यांत मात्र पावसाचा जोर कमी राहिला असून सोयाबीन पेरणीची कामे ठप्प झाली आहेत. नागपूर जिल्ह्यात तुरळक सरींची नोंद झाली असून शेतकरी अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत..रविवार (ता.५) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला मंडलनिहाय पाऊस, मिलिमीटरमध्येकोकण : उरण ३४२, वावोशी ३३९, खोपोली ३३१, खालापूर ३३०, पोयंजे ३१८, वाशी ३१५, जसई ३११, कर्नाळा ३०५, मोरबे ३०३, पनवेल २९८, पोयनाड २९२, चौक २९१, रामराज २८८, नेरे २८७, मांदाड २८६, मुरूड, बोर्ली २८४, कामरळी २८१, कर्जत २७७, आटोणे २६१, किहीम २३६, कडाव २३३, सरळ २२९, चनेरा, घोसाळे २२३, पालघर २२१, अलिबाग, नागाव २२०, कोलाड २१४, कुंभारळी २१०, मुंब्रा २०६, चरी २०५, अंबरनाथ, खेड १८०, खारबाव, बालकुम १७८, सरळगाव १५७, राजापूर १५६,.कणकवली १५१, बोईसर, भरणे १४९, म्हसा, म्हसळा, म्हारळ बुद्रुक १३९, नाते १३७, तळा, महाड १३६, मुरबाड, वाकण १२९, लोणेरे १२७, चिपळूण, देहरी १२६, दापोली, बुरोंडी १२४, मंडणगड १२३, पडघा, धामणंद १२२, माणगाव, निजामपूर १२१, टिटवाळा, मांडवी, माणिकपूर, निर्मळ ११९, शिरगाव ११८, दिगाशी, श्रीवर्धन, वालवटी ११७, बिरवाडी, शिवळे ११५, पाटपन्हाळे ११०, शहापूर, वाशिंद १००, किन्हवली ९४, राहूर ९२, डोळखांब, पावस ७९, वाडा, कोने, कंचाड ७७, गुहागर ७६, चिंचणी, मसुरे ७३, खेडशी ७०, रामपूर, फणसावणे ६९, माडुरा, ओरस बुद्रुक ६७, आचरा, देवरूख, आंबेरी ६६, फणसोप ६५..मध्य महाराष्ट्र : आंबवणे २५३, लोणावळा, कुसगाव २१९, महाबळेश्वर १७८, चिंचवड, वडगाव, तळेगाव, टाकवे बुद्रुक, वडेश्वर, पैठ, चाकण, करंजविहीर १७२, मान, काळे, शिवणे, परिंदवाडी १५२, माळे, मुठे, कोलवण, पोंगाव १३१, खडकाळा १२८, कुडे, आंबेगाव १२६, टाकवे खुर्द १२२, वेल्हे ११५, बामणोली, तपोळा, लमाज ९९, जावळी, सरवडे, सलवान ९५, बाजार, करंजफेर ९२, आवळी ९१, राधानगरी, पिंपळगाव ८७, करडवाडी ८६, राजूर, आपटाळे, मढ, कुर ८५, कडगाव ८३, खडक्येव/कापशी ८२, मंगाव, कोवाड, तुर्केवाडी ७४, उबार्डा, कोतोली ७३, कसबा ७२, मुरगुड ७१, पन्हाळा ७०, चरण, सांगरुळ, बिंद्री, देवळगाव ६९, आजरा, उत्तूर ६८, मेहुनबरे, गवसे, कुंभारझरा ६७, केळघर, करहर, पडळ ६६, गर्गोटी, मालीगरे ६५.विदर्भ : कावराबांध १०१, गंगाझरी ९१, कट्टीपर ८८, आमगाव ८७, सालेकसा ८२, आमगाव खुर्द ८१..Rain Update: राज्यात ४ जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर ९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; पावसाचा जोर वाढणार.२०० मि.मी.वरील ठिकाणेकोकण : उरण ३४२, वावोशी ३३९, खोपोली ३३१, खालापूर ३३०, पोयंजे ३१८, वाशी ३१५, जसई ३११, कर्नाळा ३०५, मोरबे ३०३, पनवेल २९८, पोयनाड २९२, चौक २९१, रामराज २८८, नेरे २८७, मांदाड २८६, मुरूड, बोर्ली २८४, कामरळी २८१, कर्जत २७७, आटोणे २६१, किहीम २३६, कडाव २३३, सरळ २२९, चनेरा, घोसाळे २२३, पालघर २२१, अलिबाग, नागाव २२०, कोलाड २१४, कुंभारळी २१०, मुंब्रा २०६, चरी २०५मध्य महाराष्ट्र : आंबवणे २५३, लोणावळा, कुसगाव २१९,.मराठवाड्यात दमदार पावसाची प्रतीक्षामराठवाड्यात पावसाचे चित्र असमान राहिले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही भागांत हलक्या सरींची नोंद झाली असली, तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. जायकवाडी धरण क्षेत्रात अद्याप मर्यादित आवक आहे. धाराशिव आणि बीड जिल्ह्यांतही पावसाचा जोर कमी असून, सोयाबीन व तूर पिकांच्या पेरण्या पावसावर अवलंबून आहेत. लातूर आणि उस्मानाबाद भागात तुरळक पावसामुळे शेतकरी मोठ्या सरींच्या प्रतीक्षेत आहेत. नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला असला तरी पेरणीला गती मिळालेली नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.