Vidarbha Rainfall and Weather Forecast: पश्चिम विदर्भातील विविध भागांत शनिवारी (ता.९) मध्यरात्रीनंतर सकाळ दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा मॉन्सूनपूर्व पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा दुपारपर्यंत खंडित होता. तीव्र उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी संत्रा आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विशेषतः संत्रा बागांचा ‘ताण’ तुटण्याची भीती व्यक्त होत आहे..गेल्या काही दिवसांपासून पश्चिम विदर्भात तापमानाने उच्चांक गाठला असून नागरिक उकाड्याने त्रस्त झाले होते. अशात शनिवारी पहाटे अचानक पावसाने हजेरी लावत वातावरणात गारवा निर्माण केला. अकोला शहरासह तेल्हारा तालुक्यात पाऊस झाला. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात डोणगाव परिसरातही पावसाची नोंद झाली..Pre Monsoon Rain Impact: हळद, वैरण भिजल्याने हदगाव, लोह्यामध्ये शेतकऱ्यांची धावपळ.वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात पहाटे साडेचारच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह जवळपास तासभर पाऊस कोसळला. ४४ अंश सेल्सिअस तापमानाने अंगाची लाहीलाही होत असताना या पावसामुळे उकाड्यापासून काहीशी सुटका झाली. मात्र, जोरदार वाऱ्यामुळे आंब्याच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे. .तसेच संत्रा उत्पादकांसाठी हा पाऊस धोक्याचा इशारा मानला जात आहे. सध्या संत्रा बागा आगामी बहरासाठी ताणावर ठेवण्यात आल्या आहेत. अशावेळी झालेल्या पावसामुळे बागांचा ताण तुटण्याची शक्यता असून पुढील बहर प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ शकतात..Pre Monsoon : विदर्भातील ११ जिल्ह्यात पावसाचा अंदाज.दरम्यान, या पावसामुळे मान्सूनपूर्व शेतीकामांना वेग येण्याची शक्यता असून हळद लागवडीसाठी तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.सध्या संत्रा उत्पादकांनी बागा ताणावर सोडल्या आहेत. काल रात्रीच्या पावसामुळे हा ताण तुटण्याची भीती आहे. पुन्हा पाऊस झाल्यास संत्रा बागायतदारांसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते,”गोपाल बोरकर, संत्रा उत्पादक, वडजी, जि. वाशीम..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.