Fertilizer Management: हळद हे साधारण ८ ते ९ महिन्यांचे पीक. चांगली वाढ आणि उत्पादनासाठी खत व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. सध्या अनेक शेतकरी हळद पिकासाठी ठिबक सिंचनाचा वापर करतात. ठिबकद्वारे पाण्यासोबत विद्राव्य खते देण्याच्या पद्धतीला फर्टिगेशन म्हणतात. हळदीला फर्टिगेशनद्वारे खत देताना पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार खतांची मात्रा विभागून देणे फायदेशीर ठरते..आठवड्यानुसार खत देणे फायदेशीरहळदीला संपूर्ण खत एकाच वेळी देण्याऐवजी पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आणि आठवड्याच्या नियोजनानुसार विभागून फर्टिगेशन करावे. त्यामुळे अन्नद्रव्यांचा अपव्यय कमी होतो आणि पिकाला आवश्यकतेनुसार अन्नद्रव्ये उपलब्ध होण्यास मदत होते. परिणामी हळदीच्या कंदांची चांगली वाढ होण्यास मदत होते, असा सल्ला कसबे डिग्रज येथील हळद संशोधन योजनेतील प्रभारी अधिकारी डॉ. मनोज माळी यांनी दिला आहे..Turmeric Yellow Leaves: हळद पिकाची पाने पिवळी पडण्यामागील कारणे आणि उपाय.एकूण किती खत?दिलेल्या शिफारशीनुसार, प्रति एकर संपूर्ण हंगामात ६० किलो नत्र, ३० किलो स्फुरद आणि ३० किलो पालाश ठिबक सिंचनाद्वारे द्यावे..३ ते ४ आठवडे: उगवणीचा काळलागवडीनंतर ३ ते ४ आठवड्यांपर्यंत हळदीची उगवण अवस्था असते. या काळात एकूण ६ किलो नत्र, ६ किलो स्फुरद आणि ३ किलो पालाश द्यावे. ही मात्रा दोन समान हप्त्यांत द्यावी. म्हणजे दर आठवड्याला ३ किलो नत्र, ३ किलो स्फुरद आणि १.५ किलो पालाश ठिबकद्वारे द्यावे..Turmeric Cultivation: रिसोड तालुक्यात यंदा हळद लागवडीत वाढ होण्याची शक्यता.५ ते १४ आठवडे: शाकीय वाढीचा काळहळदीच्या शाकीय वाढीसाठी हा महत्त्वाचा कालावधी आहे. या १० आठवड्यांत एकूण ३० किलो नत्र, ९ किलो स्फुरद आणि ६ किलो पालाश द्यावे. यासाठी दर आठवड्याला ३ किलो नत्र, ९०० ग्रॅम स्फुरद आणि ६०० ग्रॅम पालाश द्यावे..१५ ते २६ आठवडे: कंद वाढीचा काळया अवस्थेत हळदीच्या कंदांची वाढ सुरू होते. १२ आठवड्यांत एकूण १५ किलो नत्र, ९ किलो स्फुरद आणि ९ किलो पालाश द्यावे. म्हणजे दर आठवड्याला सुमारे १.२५ किलो नत्र, ७५० ग्रॅम स्फुरद आणि ७५० ग्रॅम पालाश ठिबकद्वारे द्यावे..२७ ते ३२ आठवडे : कंद तयार होण्याचा काळहळदीच्या कंदांची वाढ आणि तयार होण्याच्या या सहा आठवड्यांच्या काळात एकूण ९ किलो नत्र, ६ किलो स्फुरद आणि १२ किलो पालाश द्यावे. दर आठवड्याला १.५ किलो नत्र, १ किलो स्फुरद आणि २ किलो पालाश द्यावे..डॉ. मनोज माळी, ९४०३७७३६१४ प्रभारी अधिकारी, हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.