Weather Forecast Errors: एखाद्याने दहा हवामान अंदाज केले आणि त्यातील दोन बरोबर आले, तर त्या दोन अंदाजांचीच चर्चा होण्याची शक्यता असते. उरलेले आठ चुकलेले अंदाज हळूहळू विस्मरणात जातात. त्यामुळे ‘यांचा अंदाज नेहमीच बरोबर येतो’ असा भास निर्माण होऊ शकतो. वैज्ञानिक पद्धतीत मात्र चुकलेल्या अंदाजांचीही नोंद ठेवली जाते.