Nashik News : हवामान आधारित फळपीक विमा योजना सन २०२५ अंतर्गत नाशिक जिल्ह्यासाठी आंबिया बहरात डाळिंब, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, स्ट्रॉबेरी या फळपिकांचा समावेश आहे..या योजनेत सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक असून शेतकऱ्यांनी अर्जसोबत आधार कार्ड, ७/१२ उतारा, फळबागेचा अक्षांश व रेखांशसह फोटो व बँक पासबुकची प्रत इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच ॲग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक करण्यात आलेला आहे..Fruit Crop Insurance : हवामान आधारित फळपीक विमा योजना जाहीर.या योजनेअंतर्गत कमी पाऊस, पावसाचा खंड, जास्त तापमान, सापेक्ष आर्द्रता, या हवामान धोक्यापासून संरक्षण मिळणार आहे. मात्र ओळखपत्र क्रमांकाशिवाय योजनेत सहभाग नोंदविता येणार नाही. .तसेच पीक आणि फळपीक विमा योजनेत सहभाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना हे पीक पाहणीमध्ये नोंद असणे आवश्यक आहे. ई–पीक पाहणीमधील नोंद व विमा उतरविलेले पीक यात विसंगती आढळल्यास केलेला विमा अर्ज रद्द होईल याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे..शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकअंतर्गत शकॉतकरी ओळखपत्र क्रमांक काढल्यानंतरच या योजनेत सहभाग नोंदविला जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विहित मुदतीपूर्वी ॲग्रीस्टॅकअंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक काढून घ्यावा. .Fruit Crop Insurance: फळ पीकविमा योजनेत अनेक त्रुटी कायम.त्यानंतरच या योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी pmfby.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा किंवा नजिकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.....अशी आहे योजनाफळपिकाचे नाव...विमा संरक्षित रक्कम (प्रति हेक्टरी)...विमा हप्ता रक्कम प्रति हेक्टरी (शेतकरी हिस्सा)...विमा हप्ता भरण्याचा अंतिम दिनांककाजू...१,२०,०००...६,०००...३० नोव्हेंबर २०२५केळी...१,७०,०००...८,५००...३० ऑक्टोबर २०२५द्राक्ष...३,८०,०००...१९,०००...१५ ऑक्टोबर २०२५आंबा...१,७०,०००...८,५००...३१ डिसेंबर २०२५स्ट्रॉबेरी...२,४०,०००...१२,०००...१४ ऑक्टोबर २०२५डाळिंब...१,६०,०००...८,०००...१४ जानेवारी २०२६.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.