Someshwar News: ‘‘राज्यात पूरग्रस्तांवर अस्मानी संकट कोसळले आहे. परवाच बावीसशे कोटींची मदत दिली असून, ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवत आहोत. तसेच, केंद्र सरकारकडून अधिकचा निधी आणणे, पंतप्रधानांना मदतीसाठी निवेदन देणे, हे काम मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळ करत आहे. बाधितांसाठी जे जे करता येईल, ते ते करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. निकषांपेक्षा अधिक कसे देता येईल ते पाहतोय. निधीची कुठेही कमतरता भासू देणार नाही. आम्ही उपकार करत नाही कर्तव्यच करत आहोत,’’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. .येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी भर पावसात झालेल्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप होते. याप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, राजवर्धन शिंदे, संभाजी होळकर, शहाजी काकडे, आर. एन. शिंदे, प्रमोद काकडे, राजेंद्र यादव, जगन्नाथ लकडे, ॲड. हेमंत गायकवाड, भरत खैरे आदी उपस्थित होते..Maharashtra Flood Relief: राज्यातील नुकसानीचा एकत्रित प्रस्ताव द्या, मदत करू.अजित पवार म्हणाले, ‘‘नीरा डावा कालव्याला जिथे गळती आहे, फुटण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी अस्तरीकरण करावे लागेल. सरसकट अस्तरीकरण करणार नाही. वाहतूक वाढल्याने सोमेश्वर कारखान्यावरील रस्त्याकडेची दुकानांची जुनी रांग आता हलवावी लागेल. रस्ता रुंद करायचा आहे..सर्व दुकानदारांना कारखान्याने चांगला पर्याय दिला आहे, तो स्वीकारावा कारखाना किंवा इतरत्र अपहार, फसवणूक कुणी केल्यास मी अजिबात माफ करणार नाही. जाती-जातीत किंवा धर्मा-धर्मात भांडून आपल्यातल्या सलोख्याला दृष्ट लावू नका. शाहू-फुले-आंबेडकर यांचाच विचार जपा.’’ नितीन यादव यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी आभार मानले..Flood Relief: पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिक्षक आणि सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांचा मदतीचा हात.कारखान्यातही ‘एआय’‘‘ऊस उत्पादनात एआयचा वापर करावाच लागेल. तसेच, कारखान्यातही साखर उतारा वाढविणे, लॉसेस कमी करणे, कार्यक्षमता वाढविणे यासाठी एआयचा वापर करण्यासाठी बैठका लावत आहोत. आधी ज्यांना परवडेल त्या कारखान्यांत करू. यशस्वी झाल्यावर सहकारी कारखान्यात करू,’’ असे अजित पवार म्हणाले..आम्हाला फार खाज होती म्हणून माळेगाव कारखान्याचा चेअरमन झालो. आता पुढं सोमेश्वरचा पण चेअरमन होणार आहे. सगळ्यांचे रेकॉर्डच मोडतो, अशी मिस्किली अजित पवार यांनी केली. पुढे ते म्हणाले, ‘ही गंमत होती. नाहीतर ज्याला चेअरमन व्हायचेय त्याची झोप उडायची. आम्ही कुठं जाऊ? असा प्रश्न इच्छुकांना पडेल.’ - अजित पवार, उपमुख्यमंत्री.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.