Farmer Loss: उन्हाळ्याच्या हंगामात मोठी मागणी राहणाऱ्या कलिंगडाच्या दरात यंदा मोठी घसरण झाली असून, सध्या दर्जेदार कलिंगडाला अवघा ५०० ते ६०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. हंगामाच्या सुरुवातीला दोन हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळालेले दर आता थेट मातीमोल झाल्याने उत्पादन खर्च निघणेही कठीण झाल्याची भावना शेतकरी बोलून दाखवत आहेत. कलिंगडाच्या बाबतीत राज्यात सर्वत्र तीच परिस्थिती असल्याचे ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांनी सांगितले. .बाजारपेठेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हंगामाच्या सुरुवातीला कलिंगडाला चांगले दर मिळाले होते, मात्र गेल्या दीड महिन्यापासून दरात सातत्याने घसरण सुरू आहे. सध्या अकोला जिल्ह्यात कलिंगडाचा हंगाम जोरात असताना व्यापारी मात्र विविध कारणे पुढे करून अत्यंत कमी दराने मागणी करत आहेत. दर्जेदार मालाचा उठाव कमी झाला असून, दुय्यम प्रतीच्या मालाला तर व्यापारी विचारतही नसल्याची विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. दुय्यम मालाचे सौदे केवळ ३०० ते ४०० रुपयांच्या दरम्यान होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे..Fruit Rate Drops: खानदेशात केळी, कलिंगड दरात सातत्याने घसरण.पावसाळी वातावरणामुळे चिंतेत वाढगेल्या तीन चार दिवसांपासून परिसरात दररोज सायंकाळी पावसाळी वातावरण तयार होत आहे. यामुळे कलिंगड उत्पादकांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. बहुतांश बागांमधून पहिल्या दर्जाची फळे काढून झाली असून, आता शेतात राहिलेला माल पावसाने खराब होण्याची भीती व्यक्त होत आहे..Watermelon Price: खानदेशात कलिंगड दर घसरले.शेतकरीच करताहेत मार्केटिंगव्यापाऱ्यांकडून होणारी लूट टाळण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी आता स्वतःच आपल्या उत्पादनाचे मार्केटिंग सुरू केले आहे. व्यापारी कवडीमोल दराने मागणी करत असल्याने शेतकरी ट्रॅक्टर व इतर वाहनांमधून अकोल्यातील विविध मुख्य रस्त्यांवर कलिंगड विक्रीसाठी आणत आहेत. .यामध्ये दुय्यम प्रतीचा माल १० रुपये किलो, तर चांगल्या दर्जाची फळे १५ रुपये किलो दराने ग्राहकांना थेट विकली जात आहेत. व्यापाऱ्यांना माल देण्यापेक्षा थेट विक्रीतून चार पैसे हाती येतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.