Khandesh Farmers Sowing Pattern: खानदेशात आगाप कलिंगडाची लागवड सुरू आहे. पण कमी पावसाचा फटका व अन्य अडचणी यामुळे कलिंगड लागवड कमी होत आहे. यंदा लागवडीत मोठी घट होईल, असे दिसत आहे. खरबूज लागवडही अल्प राहील, असे सांगितले जात आहे. मागील हंगामात पाऊस व ढगाळ, पावसाळी वातावरण, कमी दर यामुळे कलिंगड पीक परवडले नाही. .अनेकांचे पीक शेतातच खराब झाले. यंदा यामुळे अनेक जण लागवड टाळत आहेत. कलिंगडाऐवजी कमी खर्चाच्या पिकांकडे शेतकरी वळत आहेत. कलिंगडाचे दरही अस्थिर असल्याने शेतकरी सावध आहेत. मागील वेळेस रब्बीत कलिंगडाची लागवड खानदेशात नंदुरबारातील तळोदा, शहादा भागात अधिकची झाली होती. खरिपातही लागवड कमीच होती. अनेकांनी गणेशोत्सव, नवरात्रीच्या कालावधीत आवक किंवा काढणी होईल, या दृष्टीने लागवडीचे नियोजन केले होते. पण प्रतिकूल स्थितीचा पिकास फटका बसला. उत्पादन कमी आले..Watermelon Cultivation: भरघोस उत्पादनासाठी कलिंगडाची लागवड कशी करावी?.आता रब्बीतही लागवड घटत असल्याने पॉली मल्चिग पेपरची मागणी अल्प आहे. सव्वा ते दीड फूटांवर छिद्र असलेल्या पॉली मल्चिंग पेपरचे दर प्रतिबंडल किंवा प्रतिगठ्ठा ७०० ते ८०० रुपये (एक गठ्ठा ३६४ मिटर) असे आहेत. जळगाव जिल्ह्यात लागवड मोठी घटणार आहे. खरिपात जून, जुलै व ऑगस्ट या कालावधीत कलिंगडाची लागवड झाली होती. एकूण लागवड १८० हेक्टरपेक्षा अधिक झाली होती..Watermelon Cultivation: आगाप कलिंगड लागवडीला कमी प्रतिसाद.रब्बीत लागवड अधिक असते. मागील हंगामात खानदेशात सुमारे नऊ हजार हेक्टरवर कलिंगडाची लागवड ऑक्टोबर २०२५ ते जानेवारी, मार्च २०२६ या कालावधीत झाली होती. यंदा शेतकरी वित्तीय संकटात आहेत. केळीत फटका बसला. पपई पीक हवे तसे नाही. यात शासनाकडून कुठलाही मदतनिधी, अनुदान, विमा परतावा मिळालेला नाही. तसेच कलिंगडात मोठी जोखीम आहे. त्यात एकरी ७० ते ८० हजार रुपये खर्च ८० ते ८५ दिवसात लागतो. यामुळे शेतकरी लागवड टाळत आहेत..रब्बीतील कलिंगडाची लागवड या महिन्यात ५० ते ६० हेक्टरवर होईल. तर पुढील महिन्यातील लागवड ७० ते ८० हेक्टर एवढी राहील, अशी माहिती मिळाली. कलिंगडासाठी खानदेशात जामनेर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील तळोदा व शहादा हा भाग प्रसिद्ध आहे. जामनेरात कमी पाण्याने यंदा अधिकच्या अडचणी आहेत..आगाप लागवड घटलीआगाप लागवड या महिन्यात केली जाते. खानदेशातील आगाप लागवड १०० ते १२५ हेक्टरने कमी दिसत आहे. काही शेतकऱ्यांनी जानेवारीतच काढणी होईल, या दृष्टीने नियोजन केले आहे. लागवड जळगाव जिल्ह्यातील जामनेर, चोपडा, जळगाव, धुळ्यातील धुळे, नंदुबारातील शहादा, तळोदा होत असते. पण या भागात शेतकरी लागवडीसंबंधी तयारी करीत नसल्याचे दिसत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.