Yavatmal News: महागाव तालुक्यातील बोरी इजारा शिवारात मागील दोन महिन्यांपासून बिबट्याच्या मुक्त वावरामुळे शेतकरी प्रचंड दहशतीत आहेत. वन्यप्राण्यांच्या सततच्या हालचालींमुळे दैनंदिन शेतीकामावर मोठा परिणाम होत असून, मंगळवारी (ता. १३) सकाळी या भीतीला आणखी दुजोरा देणारी घटना घडली..जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रसराम डवरे आणि आयुब पठाण हे आपल्या शेतात गेले असता, कलिंगड (टरबूज) पिकाच्या मध्यभागी गंभीर जखमी अवस्थेत एक ‘रोही’ आढळून आला. रात्री बिबट्याने हल्ला केल्यामुळे या रोहीच्या पाठीवर खोल जखमा होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे दिसून आले. .Watermelon Crop Damage : कलिंगड नुकसान भरपाईची कृषिमंत्र्यांकडे मागणी.या झटापटीत सुमारे दोन एकर क्षेत्रातील कलिंगड पिकाची मोठी नासधूस झाली आहे. घटनेची माहिती मिळताच शेतकरी नेते मनीष जाधव यांनी घटनास्थळी भेट देत काळीदौलत खान वनपरिक्षेत्राचे वनअधिकारी मेश्राम व वनपाल चिरमाडे यांना कळवून जखमी रोहीचे तातडीने रेस्क्यू करून उपचार करण्याची मागणी केली. तसेच भरपाईसाठी तातडीने मौका पंचनामा करण्याची मागणीही करण्यात आली..Watermelon Crop Damage : पाण्याअभावी टरबूज, खरबूज पीक धोक्यात.या शिवारात बिबट्या, रानडुक्कर, रोही व कोल्ह्यांचा कायमस्वरूपी वावर असल्याने शेती करणे अवघड बनले आहे. रोहीचे कळप तूर व इतर पिके जमीनदोस्त करत असून, विविध उपाययोजना करूनही पिकांची रोज नासधूस सुरूच आहे. शेतीवरच उपजीविका अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांमध्ये यामुळे तीव्र अस्वस्थता आहे..वन विभागाने बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या जमिनी वनविभागाने भूसंपादन कराव्यात, अशी ठाम मागणी मनीष जाधव यांनी केली. योग्य कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. या वेळी प्रसराम डवरे, आयुब पठाण, ज्ञानेश्वर राठोड, विशाल जाधव, केशव पवार, कुंडलिक डवरे, गोपाल जाधव, रतन पवार यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. वन विभागाकडून चिरमाडे, केंद्रे, हगवणे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.