Jalgaon News: खानदेशात रब्बी हंगाम सुरू झाला आहे. त्यासाठी यंदा गिरणासह अन्य सिंचन प्रकल्पांतून सिंचनासाठी पाणी मिळणार आहे. कारण सर्वच प्रमुख प्रकल्पांत यंदा १०० टक्के जलसाठा होता. .गिरणा धरणातून मागील हंगामातही रब्बीला पाणी मिळाले होते. पण २०२३ मध्ये दुष्काळी स्थितीमुळे हे धरण फक्त ५६ टक्के भरले होते. यंदा हे धरण १०० टक्के भरले आहे. यामुळे गिरणा पट्ट्यातील २१ हजार हेक्टरला या धरणातून पाणी मिळेल. तसेच जळगाव जिल्ह्यात हतनूर, वाघूर, धुळ्यात अनेर, पांझरा या प्रकल्पांतूनही रब्बीस पाणी मिळेल..Upasa Irrigation Scheme: उपसा सिंचन योजनेतून संगमनेरमधील १४ गावांचा पाणीप्रश्न सुटणार; महायुती सरकारच्या निर्णयाची विखे पाटलांकडून माहिती.रब्बीची पेरणी १०० टक्क्यांवर जाईलहरभरा, दादर ज्वारी, मका, भाजीपाला पिके, कांदा, सोयाबीनची पेरणी रब्बी हंगामात सुमारे १०० टक्के होईल, अशी अपेक्षा आहे. तसेच सोयाबीन पेरणीचेही नियोजन अनेकांनी केले असून आहे. ही पेरणी पुढील महिन्यात सुरू होईल, असेही संकेत आहेत..सोयाबीनचे दर कमी अधिक झाले आहेत. परंतु रब्बीत मका, गहू, ज्वारी पीक परवडत नाही, असेही शेतकरी मानतात. खरिपातील पीक काढणी, मळणी अपवाद वगळता पूर्ण झाली आहे. ऑक्टोबरच्या मध्यात रब्बीची पेऱणी सुरू झाली..Irrigation Development: सिंचन अनुशेष निर्मूलनासाठी पाहिजे १६३९ कोटींचा निधी.खरिपात हानीशेतकऱ्यांना खरिपात चांगले उत्पादन हाती आलेले नाही. कारण अतिपावसात हानी झाली. अनेकांचे मका पीक कमी दर मिळत असल्याने शेतात पडून आहे. उडदास कमी दर होता. मूग उत्पादन आले नाही. कापूस पिकात रोगराई आहे. उत्पादन कमी आहे. त्यात दर कमी असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. यामुळे रब्बीबाबत उत्पादनाची अपेक्षा आहे..रब्बीमध्ये मका, गहू, दादर ज्वारी, कांदा व पुढे उन्हाळ हंगामही घेतला जाईल. तसेच रब्बीमधील सोयाबीनलाही पसंती मिळणार आहे. कारण अलीकडे सोयाबीन दरात सुधारणा झाली. त्यास दोन फवारण्या व एकदा रासायनिक खते देवूनही उत्पादन बऱ्यापैकी येते, असे निरीक्षण, अनुभव अनेकांना आहे. यामुळे यंदाही रब्बीत शेतकरी मका, ज्वारी या पिकांचे क्षेत्र कमी करून सोयाबीनचीदेखील पेरणी करतील. धुळे व नंदुरबारात अनेकांनी प्रयोग, नवीन पीक म्हणून रब्बीतील सोयाबीनला मागील हंगामात किंवा रब्बीत पसंती दिली होती..कापसावर मक्याचे नियोजनकापूस पीक घेऊन त्यात मक्याची लागवड करण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे. पूर्वहंगामी कापूस पिकाखालील क्षेत्र त्यासाठी शेतकरी ऑक्टोबरच्या अखेरीस रिकामे करण्यास सुरवात झाली आहे. पूर्वमशागत करून मका व अन्य भाजीपाला पिकांची लागवड काही भागात सुरू आहे. तर काही भागात कापूस पीक काढले जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.