Rabi Season Tention to Farmer: पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठ्यात गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ३१ टक्क्यांची घट झाली आहे. जिल्ह्यातील लहान-मोठ्या ९८ प्रकल्पांत सध्या सरासरी ६७.९१ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. गतवर्षी याच दिवशी हा साठा ९८.८५ टक्के होता. .परतीचा पाऊस दमदार झाला नाही, तर रब्बी हंगामातील सिंचनासह उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतील १२३ प्रकल्पांत सध्या सरासरी ६८.८० टक्के जलसाठा आहे..Water Storage Crisis: सांगली जिल्ह्याच्या जलसाठ्यावर संकटाचे ढग.चंद्रपूर जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांपैकी लभानसारड आणि पकडीगुद्दाम हे दोन्ही प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. पकडीगुद्दामच्या सांडव्यावरून सध्या ०.४८ क्युमेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे. चारगाव प्रकल्पात ९२.३९ टक्के, डोंगरगावमध्ये ८९.३६ टक्के आणि लालनाला प्रकल्पात ८०.८० टक्के जलसाठा आहे..Parbhani Water Crisis : परभणी जिल्ह्यातील चार लघू तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली.महाऔष्णिक वीज केंद्रासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या इरई धरणात ७७.८० टक्के, अमलनाला येथे ७५.३६ टक्के, आसोलामेंढा येथे ७४.११ टक्के आणि नलेश्वरमध्ये ७०.१७ टक्के साठा नोंदविण्यात आला आहे. मात्र, नागभीड-सिंदेवाही परिसरासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या घोडाझरी धरणात केवळ ४४.१५ टक्के, तर चंदई प्रकल्पात ५५.२४ टक्के उपयुक्त जलसाठा आहे..त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांसमोर रब्बीच्या सिंचनाची चिंता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील ८८ लघु प्रकल्पांत सरासरी ५७.८४ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. गडचिरोलीतील दिना मोठ्या प्रकल्पात ८५.५६ टक्के साठा आहे. मात्र, जिल्ह्यातील २४ लघु प्रकल्पांत सरासरी केवळ ३७.०६ टक्के जलसाठा शिल्लक आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.