Jalgaon News : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तालुक्यातील हरीपुरा व वड्री लघुबंधारे ओसंडून वाहत असल्याने नदीपात्रात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. हिंगोणा, मारूळ व न्हावी या गावांच्या परिसरातील शेतशिवारास वरदान ठरलेल्या रावेर तालुका सीमेवरील मोर धरणात ८५ टक्के जलसाठा झाला आहे. .त्यामुळे या धरण प्रशासनाच्या वतीने १५०.९६ क्युसेक पाणी मोर नदीपात्रात सोडण्यात येत असल्याने यंदा मोर नदीपात्रातून प्रथमच पाणी वाहण्यास सुरवात झाली आहे. म्हणून नदी परिसरात असलेल्या शेतशिवारातील विहिरींसह कुपनलिकांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त होत आहे..Nashik Water Storage : नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ९४ टक्क्यांवर.तालुक्यातील मारूळ, न्हावी, आमोदा, वनोली, कोसगाव, पाडळसा, अंजाळे या गावशिवारातून मोर नदी वाहते. शेळगाव प्रकल्पा ही नदी तापीला मिळत असल्याने शेळगाव प्रकल्पाचे बॅक वाॅटर पाडळसे गावापर्यंत येते. त्यात मोर धरणातील पाणी सोडल्याने बॅक वॉटरचा साठा वाढतो..पर्यायाने नदीकाठावरील गावांच्या शेतशिवारातील जलपातळीही वाढते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सातपुडा पर्वतरांगेत मोर नदीच्या उगमावर गेल्या दोन-तीन दिवसांपासून चांगला पाऊस झाला. त्यामुळे धरणाची पाणीपातळी उंचावल्याने मोर धरण प्रशासनाने मोर नदीमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारी (ता.चार) धरणातून १५०.९६ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे..Water Storage : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ प्रकल्प पूर्ण भरले.बंधारेही ओसंडून वाहण्यास सुरुवातयावल तालुक्याच्या उत्तर सीमेवरील तालुक्यातील हरिपुरा व वड्री येथील लघुबंधारे भरले असल्याने ओसंडून वाहण्यास सुरवात झाली आहे. हरीपुरा धरणाचे पाणी खडकाई तर वड्री बंधाऱ्याचे पाणी खडकाई नदीत येते. दोन्ही नद्यांचा संगम यावल येथे होतो. दोन्ही नद्यांचे पाणी यावलपर्यंत अद्याप आलेले नाही..मात्र, तरीदेखील बंधारे परिसरातील मोहराळे, वड्री येथील शिवारात या नद्या खळखळ वाहण्यास सुरवात झाली आहे. सातपुड्यातील पावसाचा जोर कायम राहिल्यास यावल शिवारातील या नद्यांना पाणी येईल. दोन्ही बंधारे भरले असल्याने यावलसह परिसरातही या नद्या वाहण्यास सुरवात होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.