Pune News: आंबेगाव आणि शिरूर तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या निर्णयामुळे दोन्ही तालुक्यांतील एकूण ४५ गावांमधील रब्बी हंगामातील पिकांना मोठा आधार मिळणार असून, पाणीटंचाईमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे..यंदा अपुऱ्या पावसामुळे आणि मर्यादित पाणीसाठ्यामुळे रब्बी पिकांवर संकट ओढवले होते. सध्या गहू, हरभरा, कांदा, बटाटा तसेच ऊस यांसारखी पिके वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात आहेत. या अवस्थेत पाण्याची अत्यंत गरज असताना कालव्यातून पाणी उपलब्ध झाल्याने उत्पादनात वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे..Dimbhe Dam: डिंभे धरणात तीन टीएमसी पाणीसाठा.विशेषतः ऊस आणि गव्हासाठी नियमित पाण्याची आवश्यकता असल्याने हा निर्णय शेतीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. उजव्या कालव्यातील पाण्याचा लाभ केवळ शेतीपिकांपुरता मर्यादित राहणार नसून जनावरांसाठी लागणाऱ्या हिरव्या चाऱ्यालाही होणार आहे..त्यामुळे दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल, असा विश्वास पशुपालकांनी व्यक्त केला आहे. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत होती. कालव्यातून पाणी सोडल्याने विहिरी व बोअरवेलच्या पातळीत वाढ होऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागेल, अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली..डिंभे धरण (पाणीसाठा व आवर्तन स्थिती)एकूण उपयुक्त क्षमता : १२.४९ टीएमसीसध्याचा पाणीसाठा : ७.९२ टीएमसीगेल्या वर्षीचा साठा (याच कालावधीत) : ६.८१ टीएमसीडाव्या कालव्यास पाणी : ६७५ क्युसेकउजव्या कालव्यास पाणी : ५० क्युसेकलाभार्थी गावे : ४५ (आंबेगाव, शिरूर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.