Community Action: पुण्यातील यशदा (यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमी) यांच्या पुढाकारातून राज्याच्या महसुली विभागात (मुंबई वगळून) व्यापक जलसाक्षरता मोहीम राबविण्यात येत आहे. सुमारे साडेबारा हजार स्वयंसेवक, नागरिक, शासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांच्या सहभागातून ३४ जिल्हे, ३४ जिल्हा परिषद, ३५२ पंचायत समित्या आणि सुमारे २८ हजार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ही मोहीम प्रभावीपणे सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे..राज्यात वाढत्या पाणीटंचाई, घटणारी भूजलपातळी आणि अनियमित पर्जन्यमान या पार्श्वभूमीवर जलसाक्षरता निर्माण करणे अत्यावश्यक ठरत आहे. २०२२ पासून सुरू असलेल्या या प्रशिक्षण उपक्रमांतर्गत स्वयंसेवकांना गावनिहाय पाण्याचा ताळेबंद (वॉटर बजेटिंग) तयार करणे, पाणी वापराचे नियोजन, भूजल पुनर्भरणाच्या उपाययोजना, छतावरील पावसाचे पाणी संधारण (रेनवॉटर हार्वेस्टिंग), तसेच शेतीसाठी ठिबक व तुषार सिंचनासारख्या सूक्ष्म सिंचन पद्धतींचा प्रसार याबाबत मार्गदर्शन केले जात आहे..Water Literacy : दुष्काळाचा सामना करण्यासाठी गावकऱ्यांनी जलसाक्षर होणे आवश्यक.याशिवाय नदी स्वच्छता, नदी पुनर्भरण, स्थानिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, गाळ काढणे, पारंपरिक जलसंवर्धन पद्धतींचा पुनर्वापर आणि ग्रामपातळीवरील जलव्यवस्थापन समित्यांची भूमिका यावर विशेष भर देण्यात येत आहे. प्रत्येक गावाने स्वतःचा वार्षिक जलआराखडा तयार करून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असा संदेश या मोहिमेतून दिला जात आहे..समुद्र व गोड्या पाण्यातील वाढते प्रदूषण आणि त्यातून होणारा जैवविविधतेचा ऱ्हास लक्षात घेऊन पर्यावरणपूरक जलव्यवस्थापनाचे धडेही प्रशिक्षणात समाविष्ट करण्यात आले आहेत. जलस्रोतांचे संवर्धन आणि परिसंस्थेचे संरक्षण यांचा परस्परसंबंध स्पष्ट करून शाश्वत विकासाची संकल्पना रुजविण्यावर भर देण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक गाव जलसाक्षर करून भविष्यातील पाणीटंचाईला सामोरे जाण्यास सक्षम बनविणे आणि लोकसहभागातून शाश्वत जलव्यवस्थापनाची भक्कम पायाभरणी करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे..Buldana Water Scarcity: बुलडाणा तालुक्यातील तीन गावांसाठी टँकर मंजूर.गाव-शिवाराबाहेरून घेतलेले पाणी स्वयंसेवकांचे स्वयंस्फूर्तीने कामजलनायक (राज्यस्तरीय) २४जलयोद्धा (विभागनिहाय) ४८जलप्रेमी (जिल्हा पातळीवर) ३४०जलदूत (तालुका पातळीवर) ३५१०जलसेवक (ग्रा. पं. पातळीवर) ७५७५जलकर्मी (जिल्हा पातळीवर) १०२०.राज्यातील या संस्थामधे सुरू आहे प्रशिक्षणयशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी (पुणे)वाल्मी (छत्रपती संभाजीनगर)डॉ. पंजाबराव देशमुख प्रबोधिनी (अमरावती)वनप्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी (चंदपूर).पाण्याचे अंदाजपत्रक कसे करतात ?संभाव्य एकूण उपलब्ध पाणीगावाला पिण्यासाठी आणि पिकांसाठी लागणारे एकूण संभाव्य पाणी यांच्या मांडणी तुटीचा किंवा शिल्लक पाण्याचा योग्य मेळ घालून गावाची जमीन लागवडीखाली आणणे.या संपूर्ण प्रक्रियेला पाण्याचा ताळेबंद किंवा पाण्याचे अंदाजपत्रक असे म्हणतात.ताळेबंदासाठीची माहितीलोकसंख्या, जनावरे, शेळ्या-मेंढ्या, कोंबड्यांची संख्यासार्वजनिक ठिकाणाला लागणारे पाणीगावाची एकूण जमीनपडणारा पाऊस मिमीमध्येजमिनीचे उतारे व त्याचे क्षेत्रनिरनिराळ्या उतारावरून प्रति हेक्टर वाहून जाणारे पाण्याचा तक्तापाणलोटाची झालेली कामे (पाणी धारण क्षमतेनिहाय)मोकळी जमीन व वन जमीन क्षेत्र हेक्टरमध्ये.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.