Nashik News: पालखेड डाव्या कालव्याला पाण्याचे आवर्तन सुटल्याने शहराच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. गंगासागर तलाव पूर्ण क्षमतेने भरला जाणार असून, या तलावाचे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांच्यासह नगरसेवकांनी पूजन केले. मंत्री छगन भुजबळ यांनी पाणी सोडण्याच्या सूचना केल्या होत्या..शहराला पाणीपुरवठा करणारा गंगासागर तलाव आटल्याने काही दिवसांपासून शहरातील विविध भागांत गढूळ पाण्याचा पुरवठा होत होता. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेकडून आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी पाटबंधारे विभागाकडे करण्यात आली होती. .Lake Restoration: पदरमोड करत प्राध्यापिकेने केले गावतळे जिवंत.याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने पाटबंधारे विभागाला शहरासाठी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्यांच्या सूचनेनुसार आवश्यक कार्यवाही करण्यात आली आणि गंगासागर तलावात पाणी सोडण्यात आले. या निर्णयामुळे येवल्याच्या नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा होणार असून, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर दिलासा मिळाला..Lake Restoration: तलावाधारित शाश्वत उपजीविकेचे आदर्श मॉडेल.नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, गटनेते दीपक लोणारी, नगरसेवक प्रवीण बनकर, महेश काबरा, बंटी परदेशी, जावेद लखपती यांच्यासह बंडू क्षीरसागर, सुनील जाधव, यती गुजराथी, निसार शेख, गणेश गायकवाड, सचिन साबळे, संतोष जेजूरकर, सचिन सोनवणे आदींच्या उपस्थितीत पाणीपूजन झाले..यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने ओव्हफ्लोचे पाणी पालखेड कालव्याला सुरू होते. त्यामुळे डिसेंबरअखेर दर वर्षी मिळणारे आवर्तन यंदा उशिरा मिळाले. १३ जानेवारीला कालव्याला पाणी सुटूनही १६ जानेवारीला पाणी तलावात आले असून, कालव्याला १८ ते २० दिवस आवर्तन सुरू राहणार असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले. शहराला टंचाईत पालिकेकडून पाच ते सात दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. इतर दिवशी तसेच पावसाळ्यात तीन दिवसांआड पाणीपुरवठा होत होता. आताही पालिका तीन दिवसांआड पाणीपुरवठा करणार असून, तलावातील पाणी तीन महिने पुरवावे लागणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.