Water Scarcity : परभणी मागील महिनाभरात जिल्ह्यातील २२ लघू सिंचन प्रकल्प आणि दोन मध्यम प्रकल्पांतील सरासरी पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झालेली नाही. गुरुवारी (ता. ६) घेतलेल्या नोंदीनुसार लघू प्रकल्पांत ६.५१५ दशलक्ष घनमीटर (दलघमी) म्हणजे सरासरी १२ टक्के, तर मध्यम प्रकल्पांत सुमारे ५.०७७ दलघमी म्हणजे सरासरी १० टक्के पाणीसाठा होता. दरम्यान, १३ लघू प्रकल्पांतील पाणीसाठा अद्याप जोत्याखाली आहे..महिनाभरापूर्वी गुरुवारी (ता. ९ जुलै) लघू सिंचन प्रकल्पांत सरासरी ४.६७७ दलघमी म्हणजे ११ टक्के, तर दोन मध्यम प्रकल्पांत ४.४८३ दलघमी म्हणजे सरासरी नऊ टक्के पाणीसाठा होता. त्या वेळी जिल्ह्यातील १० लघु प्रकल्प कोरडे होते, तर १० प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली होता..Parbhani Dam Water Update: परभणी जिल्ह्यातील लघु प्रकल्पांत ११, मध्यम प्रकल्पांत ९ टक्के पाणीसाठा.जिंतूर तालुक्यातील देवगाव, जोगवाडा, बेलखेडा, वडाळी, चारठाणा, चिंचोली, आडगाव, केहाळ, भोसी, कवड, मांडवी, दहेगाव तसेच सोनपेठ तालुक्यातील नखातवाडी या लघू सिंचन प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली आहे..Dam Water Storage Update: लातूर जिल्ह्यातील प्रकल्प तहानलेलेच!.महिनाभरापूर्वी जोत्याखाली पाणीसाठा असलेल्या गंगाखेड तालुक्यातील टाकळगाव आणि कोद्री प्रकल्पांत आता अनुक्रमे एक आणि २१ टक्के पाणीसाठा झाला आहे. परभणी तालुक्यातील पेडगाव आणि मानवत तालुक्यातील आंबेगाव प्रकल्पांत प्रत्येकी ३१ टक्के, तर पाथरी तालुक्यातील झरी प्रकल्पात ३६ टक्के पाणीसाठा आहे..गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव प्रकल्पात १४ टक्के, पिंपळदरीत ३९ टक्के, तर पालम तालुक्यातील तांदुळवाडी प्रकल्पात ३५ टक्के पाणीसाठा आहे. पाडाळी (ता. मंठा) लघू प्रकल्पात आठ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी ६ ऑगस्ट रोजी लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ८.३६ दलघमी म्हणजे १८.६० टक्के पाणीसाठा होता, अशी माहिती देण्यात आली..मध्यम प्रकल्पांत १० टक्के साठाकरपरा मध्यम प्रकल्पाची पूर्ण जलक्षमता २८.८२० दलघमी असून, उपयुक्त साठा क्षमता २४.९०० दलघमी आहे. मासोळी मध्यम प्रकल्पाची पूर्ण जलक्षमता ३४.०८५ दलघमी असून, उपयुक्त साठा क्षमता २७.१४१ दलघमी आहे. गुरुवारी (ता. ६) करपरा प्रकल्पात १.०४३ दलघमी म्हणजे चार टक्के, तर मासोळी प्रकल्पात ४.०३४ दलघमी म्हणजे १५ टक्के पाणीसाठा होता. दोन्ही मध्यम प्रकल्पांत मिळून सरासरी सुमारे १० टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी ६ ऑगस्ट रोजी करपरा प्रकल्पात २३.२१ टक्के, तर मासोळी प्रकल्पात ४.३४ टक्के पाणीसाठा होता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.