Amravati News: अनुशेष निर्मूलन कार्यक्रमांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या अचलपूर तालुक्यातील वासनी मध्यम सिंचन प्रकल्पाचे काम २०१७-१८ पासून रखडले आहे. परिणामी, संभाव्य लाभापासून शेतकरी व ग्रामस्थ वंचित आहेत..अनुशेष निर्मूलन कार्यक्रमांतर्गत अमरावती जिल्ह्यात २००७ मध्ये २३ प्रकल्प मंजूर करण्यात आले होते. त्यामध्ये अचलपूर तालुक्यातील वासनी बु. येथील वासनी मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे. १०२. ८१ कोटी रुपयांची मूळ प्रशासकीय मान्यता असलेल्या या प्रकल्पास ६७३.६३ कोटी रुपयांची द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, तर २०२३ मध्ये ८२३ कोटी रुपयांची तृतीय प्रशासकीय मान्यता देण्यात आली..Irrigation Projects: कोल्हापुरातील डोंगर, पायथ्याच्या ओसाड जमिनीत फुलणार शेती.सप्टेंबर २००८ मध्ये या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास प्रारंभ झाला असला तरी ते २०१७ पासून निधी न मिळाल्याने रखडले आहे. प्रकल्पांच्या प्रारंभी भूसंपादन व पुनर्वसनाची अडचण होती, त्यानंतर पर्यावरण मान्यता मिळाली नव्हती. या अडचणींवर मात करून काम पुढे सुरू झाले व जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाल्यानंतर ते रखडले. २०१७ पासून रखडलेल्या कामाची गाडी पुढे सरकलेली नाही..शासनाने या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या ६५.६५ कोटी रुपयांचे दायित्व मंजूर केले नसल्याने काम पुढे सरकत नसल्याचे वास्तव आहे. कंत्राटदाराने आधी दायित्व देण्याची अट मांडली असून त्याची निविदाही रद्द करणे शासनाला अशक्य झाले आहे. सिंचन घोटाळ्यातही या प्रकल्पाचा समावेश होता व त्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशीही करण्यात आली होती. या प्रकल्पाच्या कंत्राटदारास निलंबित करण्यात आले नसून दायित्व मंजूर केल्याशिवाय त्याची निविदा रद्द करता येत नसल्याची अडचण आहे..Irrigation Projects Storage: धुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांत साचला गाळ....असा आहे प्रकल्पवासनी मध्यम प्रकल्पाची २०.३५ मीटर उंची असून लांबी २१०० मीटर इतकी आहे. प्रकल्पाची पाणीसाठा क्षमता २२.५९१ दलघमी आहे. यामुळे अचलपूर, दर्यापूर अंजनगाव या तालुक्यातील एकूण २२ गावांतील ४,३१७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पातील बुडीत क्षेत्र धरणाकरिता ५३१ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. यातील १२९ हेक्टर जमीन सरळ खरेदीद्वारे संपादित केली आहे..या गावांना सिंचनाचा लाभया प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील ४,३१७ हेक्टर जमीन ओलिताखाली येत असून त्याकरिता १४ किमी लांबीचा कालवा किंवा जलवाहिनीद्वारे सिंचन करण्याचा शासनाचा प्रस्ताव आहे. त्यामुळे अचलपूर तालुक्यातील रावळगाव, दोनद, सावळी खुर्द, चिंचखेड, सावळी बु., येवता, शंकरपूर, वळगाव खुर्द, तिरमलपूर, असदपूर, रंगार वासणी, रायपूर, शहापूर, कोल्हा, नरसिंगपूर, दर्यापूर तालुक्यातील बेंबळा बु., शिवरखेड, प्रल्हादपूर, सांगवा खुर्द तसेच अंजनगाव तालुक्यातील कजबेगव्हाण, साखरी, घोडसगाव या गावांना सिंचनाचा लाभ होणार आहे.Irrigation Project.या प्रकल्पाचा ८२३ कोटींच्या प्रस्ताव मंजुरीसाठी सरकारने राजकीय इच्छाशक्ती दाखविण्याची गरज असल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले. असून विद्यमान सरकारने ती दिल्यास बोरगाव पेठ गावाचे पुनर्वसन व शिल्लक कामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना सिंचनाचा प्रत्यक्ष लाभ मिळू शकणार आहे. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची आहे.- बच्चू कडू, माजी राज्यमंत्री..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.