Water Crisis: रिसोड तालुक्यातील काही भागांत पाणीटंचाईचा परिणाम हळद पिकावर होत आहे. विहिरींमधील पाणीसाठा कमी झाल्याने पिकाला सिंचनासाठी पाणी उपलब्ध करणे शेतकऱ्यांसमोर आव्हान ठरत आहे. त्यामुळे काही शेतकरी टँकरद्वारे पाणी आणून हळद पिकाला देत आहेत. एका टँकरसाठी ९०० ते एक हजार रुपये खर्च येत असल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे..मागील वर्षाच्या तुलनेत यंदा रिसोड तालुक्यात हळद लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला होता. हळदीला मिळणारा बाजारभाव लक्षात घेऊन अनेक शेतकऱ्यांनी पाच ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल दराने बेणे खरेदी करून लागवड केली. मात्र यंदा खरीप हंगामात कमी पाऊस झाल्यामुळे जमिनीतील ओलावा कमी होत आहे. त्याचा परिणाम हळद पिकाच्या वाढीवर होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..Yavatmal Water Scarcity : यवतमाळ जिल्ह्यातील पाणीप्रश्न सुटणार; दहा हजारांवर उपाययोजनांची अंमलबजावणी!.सध्या विहिरींमधील पाणीसाठा कमी झाल्याने सिंचनासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे. काही शेतकरी टँकरने पाणी आणून पिकाला देत आहेत. एका टँकरसाठी ९०० ते एक हजार रुपये मोजावे लागत आहेत. हळद लागवड, बेणे, खते आणि कीडनाशकांवर आधीच खर्च झालेला असताना सिंचनासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. त्यामुळे पाणीटंचाईचा सामना करताना शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात भर पडत आहे. .Water Scarcity: जनावरांसाठी पाणी, चारा छावणी सुरू करा; मुंगूसवाडे ग्रामस्थांचे रास्ता रोको.मी गेल्या चार वर्षांपासून हळद लागवड करीत आहे. या वर्षी एका एकरात हळद लावलेली आहे. आजवर पिकासाठी ७० ते ८० हजार रुपये खर्च केला आहे. मात्र, एका महिन्याआधी विहिरीतील पाणी आटल्याने पीक करपण्याची वेळ आल्याने टँकर सुरू केले. आजवर जवळपास २० टँकर पाणी विकत आणून पिकाला दिले. प्रत्येक टँकरसाठी ९०० ते १ हजार रुपये खर्च करावा लागत आहे.- विठ्ठल ढेंगळे, शेतकरी, केनवड, ता. रिसोड, जि. वाशीम.यंदा कमी पावसामुळे भूजलपातळीत मोठी घट झाली आहे. उपलब्ध असलेल्या मर्यादित पाण्यावर ठिबक सिंचनासह विविध उपाययोजना करून हळदीचे पीक वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पाण्याचे काटेकोर नियोजन करणे हाच सध्या एकमेव पर्याय उरला आहे.- कैलास मेसरे, शेतकरी, केनवड, ता. रिसोड. जि. वाशीम.बाजारभाव पाहून मोठ्या आशेने लागवड केली. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे संपूर्ण गणितच बिघडले आहे. विहिरींनी तळ गाठल्याने आता टँकरने पाणी विकत आणून हळदीला द्यावे लागत आहे. पाण्याचा अतिरिक्त खर्च परवडणारा नाही.- श्याम वानखेडे, युवा शेतकरी, केनवड, ता. रिसोड, जि. वाशीम.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.