Turmeric Farming: रिसोड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात हळद लागवडीला सुरुवात झाली असून सध्या लागवडीच्या कामांना वेग आला आहे. यंदा हळदीखालील क्षेत्रात मोठी वाढ अपेक्षित असून तालुक्यात आठ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड होणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. हवामान विभागाने मान्सूनबाबत विविध अंदाज वर्तविले असले तरी अनेक शेतकरी त्याकडे फारसे लक्ष न देता हळद लागवडीच्या तयारीत गुंतले आहेत..जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरुळपीर आणि वाशिम परिसरातील काही शेतकऱ्यांनी हळद लागवडीची कामे सुरू केली आहेत. मागील काही वर्षांपासून हळदीला मिळालेला चांगला बाजारभाव, उत्पादनाला असलेली वाढती मागणी आणि इतर पारंपरिक पिकांच्या तुलनेत हमखास उत्पादन देणारे पीक म्हणून हळदीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. परिणामी यंदा हळदीखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे..Turmeric Cultivation: रावेर तालुक्यात हळद लागवडीत वाढ.वाढते तापमान, हवामानातील अनिश्चितता, अवकाळी पावसाचा धोका आणि पर्जन्यमानाबाबतचे अंदाज याकडे दुर्लक्ष करून अनेक शेतकरी लागवडीसाठी बियाणे, खतांची खरेदी तसेच शेत मशागतीची कामे पूर्ण करत आहेत. काही ठिकाणी ठिबक सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष लागवडही सुरू केली असून पाण्याचे योग्य नियोजन करण्यावर विशेष भर दिला जात आहे..Turmeric Cultivation Technique: हळद लागवडीचे सुधारित तंत्र.दरम्यान, कृषी विभागाने शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन लागवडीचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची अपुरी सुविधा आहे, त्यांनी लागवडीबाबत सावधगिरी बाळगावी, असेही विभागाने स्पष्ट केले आहे. .हळद हे तुलनेने हमखास उत्पन्न देणारे आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक मानले जात असल्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात हळदीच्या वाढत्या लागवडीमुळे जिल्ह्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.