Fish Farming: दुष्काळसदृश परिस्थितीमुळे जलाशय व तलावांतील पाणीसाठा कमी झाला असून, त्याचा परिणाम मत्स्य व्यवसायावर झाला आहे. मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा असून, या व्यवसायातील नुकसानीची नोंद घेऊन मत्स्य व्यावसायिकांना अधिकाधिक मदत मिळवून देण्यात येईल, असे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी सांगितले..दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार भावना गवळी, आमदार सईताई डहाके, आमदार श्याम खोडे, आमदार बाबुसिंग महाराज राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, मत्स्य व्यवसाय आयुक्त भानूदास पालवे, प्रादेशिक उपायुक्त सु. वा. जांभुळे, सहायक आयुक्त प्रियंका झोड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते..Fisheries Business : मत्स्य क्षेत्रातील सहकारी संस्थांची भूमिका महत्त्वाची....यंदा गतवर्षीच्या तुलनेत मत्स्य उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले. जलाशयांमध्ये गाळ साचल्याने पाणीसाठवण क्षमता कमी होत असल्याने गाळ काढण्यासाठी राज्यस्तरीय कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी संबंधित यंत्रणांनी परिपूर्ण प्रस्ताव दोन आठवड्यांत शासनाकडे सादर करावेत, असे निर्देश त्यांनी दिले..Raigad Fishermen: रायगडमधील मच्छीमारांचे हेलपाटे थांबणार.मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेतील जिल्ह्यातील प्रकरणांची मंजुरी कमी असून अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याबाबतही त्यांनी आढावा घेतला. बँकांनी केवळ तांत्रिक कारणांमुळे प्रकरणे प्रलंबित ठेवू नयेत. दुष्काळाच्या परिस्थितीत मत्स्य व्यावसायिकांच्या अडचणी संवेदनशीलतेने सोडवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले..वाशीम व मालेगाव येथील फिश मार्केटच्या प्रस्तावांचा पाठपुरावा करून प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्हा नियोजन निधीतून मत्स्य व्यवसाय विकासासाठी उपलब्ध निधीसाठी प्रस्ताव सादर करण्याचेही सांगितले..दरम्यान, मंत्री राणे यांनी काजळंबा व धामणी खडी येथील जलाशयांची पाहणी करून मत्स्य व्यावसायिकांशी संवाद साधला. पाण्याअभावी व्यवसायावर परिणाम झाला असून मत्स्यबीज व बोटुकली उपलब्ध होत नसल्याच्या अडचणी त्यांनी मांडल्या. योजनांचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक मत्स्य व्यावसायिकांनी अर्ज करावेत, असे आवाहन मंत्री राणे यांनी केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.