Government Scheme: राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत वाशीम जिल्ह्यातील ५४ हजार १०७ शेतकरी लाभासाठी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ३५ हजार ४२९ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केल्याने त्यांच्या कर्जमुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे, तर १८ हजार ६७८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप प्रलंबित असल्याने त्यांनी तातडीने प्रमाणीकरण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक लटपटे यांनी केले आहे..जिल्ह्यातील ६९४ गावांमधील सेवा सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच राष्ट्रीयीकृत, ग्रामीण आणि खासगी बँकांतील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या ग्रामपंचायत, गाव चावडी, विकास सेवा संस्था आणि संबंधित बँक शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत..Farm Loan Waiver: कर्जमाफी यादीतील पात्र शेतकऱ्यांनी 'आधार प्रमाणीकरण' प्रक्रिया कशी करावी? .योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यानंतर विशिष्ट क्रमांक, आधार कार्ड, कर्ज खात्याचे व बँक खात्याचे पासबुक घेऊन जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. प्रमाणीकरणानंतर पात्र कर्जमाफीची रक्कम थेट संबंधित कर्ज खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहे. आधार प्रमाणीकरणासाठी कोणतेही शुल्क आकारू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांना दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणालाही कोणत्याही प्रकारचे शुल्क देऊ नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे..Farm Loan Waiver: कर्जमुक्ती योजनेच्या प्रक्रियेला विलंब;...तोपर्यंत थकित पीक कर्जावर व्याज आकारणी नको, बँकांना निर्देश.पोर्टलवरील कर्जाची थकबाकी ही ३१ मार्च २०२६ रोजीची असून, शासनाच्या निर्देशानुसार १ एप्रिल २०२६ नंतरचे व्याज आकारले जाणार नाही. त्यामुळे पोर्टलवर दर्शविलेली रक्कम योग्य असल्यास शेतकऱ्यांनी तत्काळ आधार प्रमाणीकरण करावे. रक्कम अथवा कर्जाच्या तपशिलाबाबत आक्षेप असल्यास पोर्टलवर ‘ग्रिव्हन्स’ नोंदविण्याची सुविधा उपलब्ध असून त्यावरील निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती घेणार आहे. .आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या ३१ मार्च २०२६ पर्यंतच्या कर्जबाकीची रक्कम संबंधित कर्ज खात्यात जमा केली जाईल. त्यानंतर कर्ज बेबाकी प्रमाणपत्र देण्यात येणार असून, कर्जमुक्त शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित बँका व सेवा सहकारी संस्थांमध्ये प्रसिद्ध केल्या जातील. सर्व पात्र शेतकऱ्यांना संबंधित बँकांमार्फत नव्याने पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सहकार विभागाने दिली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.