Dharashiva News: लोहारा तालुक्यातील दक्षिण जेवळी ग्रामपंचायत विभक्त होऊन नऊ वर्षे उलटली, तरी अद्याप प्रशासकीय स्तरावर ''वाडी विभाजन'' प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. यामुळे गावाला स्वतंत्र महसुली दर्जा मिळाला नसल्याने विकासकामे आणि शासकीय कागदपत्रांसाठी ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. बुधवारपर्यंत (ता.३१) वाडी विभाजन प्रक्रिया पूर्ण करावे. अन्यथा गुरुवारपासून (ता.१) पासून लोहारा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा येथील ग्रामस्थ व सरपंचांनी दिली आहे. .सरपंच कस्तुराबाई चिनगुंडे यांनी ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकारी, भूमिअभिलेख जिल्हा अधीक्षक, तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले आहे. यात म्हटले आहे की, १९९३ रोजीच्या भूकंपानंतर शासनाकडून दोन ठिकाणी गावाचे पुनर्वसन करण्यात आले आहे. उत्तर जेवळी आणि दक्षिण जेवळी अशी दोन गावे (वसाहती) निर्माण झाली. .Village Road Issue : शिवेचा रस्त्यावर मालकी कुणाची असते?.उत्तर जेवळीत ६५ टक्के ग्रामस्थ गेल्याने बहुतांश मुलभूत सेवा सुविधा- शाळा, आठवडी बाजार, रुग्णालय, बँका, ग्रामपंचायत कार्यालयासह विविध कार्यालय उत्तर जेवळी येथे निर्माण झाले. या दोन्ही गावातील अतंर हे चार किलोमीटर असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणाणात गैरसोयींना तोंड द्यावे लागत होते. .Dream Village Project: जिल्हा नियोजन अधिकारी यांची ‘स्वप्नातील गाव’ प्रकल्पाला भेट.यातून दक्षिण जेवळी येथील नागरिकांच्या मनात वस्तीचा अपेक्षित विकास होत नसल्याची भावना तीव्र होत दक्षिण जेवळीसाठी स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी पुढे आली. यासाठी येथील नागरिकांनी जवळपास वीस वर्ष विविध मार्गांने आंदोलन, उपोषण, निवडणुकीवर बहिष्कार आदी मार्गाने संघर्ष केला..७/१२, ८-अ उताराही मिळेना२० मे २०१७ ला दक्षिण जेवळीसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत मंजूर झाली. मात्र, ग्रामपंचायत वेगळी झाली असली तरी वाडी विभाजन न झाल्याने मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. जवळपास नऊ वर्षे उलटूनही शेतकऱ्यांना स्वतंत्र ७/१२ आणि ८-अ उतारा मिळत नाही. निधी वितरणातही अडचणी येत असल्याने गावाच्या विकासाची कामे ठप्प असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.