Nanded News: या हंगामातील उसाला पहिली उचल प्रतिटन ३ हजार रुपये द्यावी व अंतिम दर ३८०० रुपये मिळावा, या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकरी संघटनांकडून बुधवारपासून (ता. १०) चक्का जाम व कोयता बंद आंदोलनाचे हत्यार उगारण्यात आले आहे. तशा आशयाचे निवेदन शेतकरी जनआंदोलन संघर्ष समितीचे डॉ. भगवानराव मनूरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले..यासंदर्भात माहिती देताना डॉ. मनूरकर म्हणाले, की नांदेड जिल्ह्यात सध्या गाळप हंगाम सुरू आहे. परंतु साखर कारखानदार शेतकऱ्यांना २३०० ते २५०० रुपये दर देत आहेत. शेजारील तेलंगणा राज्यातील साखर कारखानदार उसाला ३३०० रुपये दर देऊन एकरी १० हजार रुपये ऊस लागवडीसाठी देत आहेत. नांदेड जिल्ह्यातील साखर कारखानदारांनीही उसाचा योग्य भाव द्यावा, यासाठी त्यांना वेळोवेळी निवेदन दिले. .Nanded Farmers Protest: पीकविमा परताव्यासाठी नांदेडमध्ये शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलन!.परंतु त्यांचे भाव न देण्याबाबत एकमत झाल्याचे दिसते. त्यामुळे याबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना २८ नोव्हेंबरला यासंदर्भात निवेदन देऊन उसाला योग्य दर जाहीर करण्याची मागणी केली होती. ऊस दरासंदर्भातल्या शासकीय धोरणाबाबत संताप व्यक्त करताना डॉ. मनूरकर म्हणाले, की शासनाने जाहीर केलेला दर कमी आहे. कमी दर आणि वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे..Sugarcane Price Protest: ऊसदरप्रश्नीचे ठिय्या आंदोलन सुरूच.धर्माबादमधील कारेगाव फाटा येथे बेमुदत चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात केवळ ऊस वाहतूक करणारी वाहने अडविण्यात येतील. त्यामुळे नागरिकांना या आंदोलनाची झळ बसणार नाही, याची काळजी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले..आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराशेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तातडीने बैठक घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, योग्य दर जाहीर होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही शेतकरी नेत्यांनी दिला आहे. या निवेदनावर डॉ. मनूरकर यांच्यासह कुमार कुर्तडीकर, गंगाधर गाडगे, उन्मेश उबाळे, रेखा चव्हाण, सुरेखा वेद्य, जेसिका शिंदे, महेश देशमुख, साईनाथ जाधव, शरद हंबर्डे, बालाजी सावळे आदी शेतकरी प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या आहेत.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.