Dam Water Release: सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप असली तरी, वारणा धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातील साठ्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे परिचालन सूचीनुसार धरणातील पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सोमवारी (ता. २७) वाजता धरणाचे चारही वक्राकार दरवाजे उघडून वारणा नदीपात्रात ३,४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, वारणा धरणात पाण्याची आवक वाढ असल्याने मंगळवारी (ता. २८) १७०० क्युसेकने विसर्ग वाढवून तो ५१०० क्युसेक केला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे..जिल्ह्याचा जुलै महिन्याचा सर्वसाधारण पाऊस १३५.५ मिलिमीटर इतका आहे. २७ दिवसांपैकी १३ दिवस पाऊस झाला असून १५९.७ म्हणजे ११७.७ टक्के इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसाxपासून पावसाचा जोर मंदावला आहे. अधूनमधून हलका पाऊस पडत आहे. तर कधी ढगाळ तर उन्ह असे वातावरण आहे. बहुतांश भागात पावसाची उघडझाप आहे..Dam Water Discharge Update: येडगाव धरणातून १७६५ क्युसेकने विसर्ग सुरू.वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आहे. त्यामुळे धरणातून सोमवारी (ता. २७) २००० व जलविद्युत प्रकल्पातून १४०० असा एकूण ३,४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला. पावसाचा जोर कायम असल्याने धरणात पाण्याची आवकही वाढत आहे. तर करण्यात आला आहे. मंगळवारी (ता. २७) पुन्हा धरणाच्या वक्रद्वारातून २००० क्युसेकने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. सद्यःस्थितीला धरणाच्या वक्रद्वारातून ३७०० तर विद्यूतगृहातून १४०० क्युसेक असा एकूण ५१०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे..Dam Water Discharge : पुणे जिल्ह्यातील धरणांतून विसर्गात घट.मंगळवारी सकाळी धरणाची पातळी ६२१.२५ मीटर इतकी नोंदविली. धरणातील एकूण साठा २८.८९ टीएमसी (८३.९९ टक्के) असून, उपयुक्त जलसाठा २२.०१ टीएमसी झाला आहे. गतवर्षी याच दिवशी धरणातील उपयुक्त जलसाठा २२.३३ टीएमसी (८१.१३ टक्के) होता..धरण परिसरात गेल्या २४ तासांत २९ मिमी पावसाची नोंद झाली असून, हंगामातील एकूण पर्जन्यमान १४०१ मिमीवर पोहोचले आहे. सध्या धरणात ८,८८३ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वारणा नदीकाठच्या गावांतील नागरिक, शेतकरी, ग्रामस्थांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.