Dam Water Release Update: सांगली जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू असून वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने धरणातील आवक वाढली आहे. त्यामुळे बुधवारी (ता. ५) रात्री वारणा धरणातून पाण्याच्या विसर्गात २ हजार ३०० क्युसेकने वाढ करण्यात आली असून सध्या ७ हजार ३०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी २.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली..वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत २३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून धरणात सध्या १० हजार ८५ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. धरणातील पाणीसाठा ३०.२८ टीएमसीवर पोहोचला आहे..Nashik Heavy Rain : अतिवृष्टीचे थौमान; पिकांची दाणादाण.दरम्यान, कृष्णा नदीच्या पाणीपातळीत काहीशी घट झाली असली, तरी नांद्रे-ब्रम्हनाळ आणि समडोळी-कोथळी मार्गांवर अद्याप पाणी असल्याने हे मार्ग गेल्या आठ दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद आहेत. या मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे..सांगली येथील आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी २०.२ फूट, तर हरिपूर येथील अंकली पुलाजवळ २४.११ फूट इतकी नोंदविण्यात आली..Nashik Heavy Rain : अतिवृष्टीचे थौमान; पिकांची दाणादाण.कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग स्थिर असून अलमट्टी धरणात १ लाख ३३ हजार १९३ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. तेथून सध्या दीड लाख क्युसेकने विसर्ग सुरू असून विसर्गात १ हजार २९७ क्युसेकने घट करण्यात आली आहे..सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध धरणांतून, सांडवे, कालवे आणि विद्युतगृहांद्वारेही विसर्ग सुरू आहे. त्यामध्ये धोम (१,८७६ क्युसेक), कण्हेर (२,८६१), धोम-बलकवडी (३३३), उरमोडी (४५०), तारळी (२२५), राधानगरी (४,२५६), तुळशी (५००) आणि कासारी (९५० क्युसेक) यांचा समावेश आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.