मंगेश तिटकारे, हेमंत जगतापशेतकऱ्यांची शेती व्यवसायातील जोखीम कमी करण्यासाठी आणि शाश्वत उत्पन्नाचा मार्ग निर्माण करण्यासाठी गोदाम पावती हा एक उत्तम मार्ग आहे. यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील गोदाम पावतीविषयक विविध वैधानिक तरतुदी व नियम माहिती असणे आवश्यक आहे. .कृषी क्षेत्रात समुदाय आधारित संस्था म्हणजेच सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी आणि महिला बचत गटांचे फेडरेशन यांच्या मार्फत व्यवसाय उभारणीच्या दृष्टीने अवलंब करण्यात येणाऱ्या विविध पर्यायांपैकी गोदाम पावती व्यवसाय भविष्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे..Warehouse Receipt: शेतीमाल तारण म्हणून वापर करतानाची नियमावली.गोदाम पावतीसाठी कायदेशीर चौकटगोदाम पावत्यांच्या विविध प्रकारांमध्ये निगोशिएबल आणि नॉन-निगोशिएबल असे दोन प्रकार आहेत. पूर्व व मध्य आशियातील (ECA) देशांमध्ये गोदाम पावती कार्यक्रम हा वाटाघाटी करण्यायोग्य (निगोशिएबल) गोदाम पावतीवर आधारित आहे. परंतु खासगी क्षेत्रातील उपक्रमांमध्ये सामान्यतः वाटाघाटी न करण्यायोग्य (नॉन-निगोशिएबल) पावत्यांचा वापर करण्यात येतो. आतापर्यंत, पूर्व व मध्य आशियातील (ECA) देशांमधील बाजारपेठेत गोदाम पावत्यांचा अत्यंत मर्यादित प्रमाणात व्यापार झाला आहे. भारत देशात गोदाम पावतीच्या बाबतीत सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाही..गोदाम पावत्यांच्या मर्यादित वापराचे एकमेव रेकॉर्ड हंगेरीमध्ये असून बुडापेस्ट स्टॉक एक्स्चेंजच्या कमोडिटी विभागाला गोदाम पावत्यांचा व्यापार करण्याचा मर्यादित अनुभव आहे. तसेच स्लोव्हाकिया या देशात २००१ मध्ये ब्रातिस्लावा कमोडिटी एक्स्चेंजद्वारे सहा दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या गोदाम पावत्यांचा व्यापार करण्यात आला. हे अंशतः या प्रदेशातील कमोडिटी एक्स्चेंजेसची अपरिपक्वता आणि काही देशांमधील कर प्रणालीवर यावर अवलंबून असते. जसे की बल्गेरियामध्ये, तेथील यंत्रणेला गोदाम पावतीसह प्रत्येक व्यवहारावर मूल्यवर्धित कर (व्हॅट) लागू करणे आवश्यक वाटते. परंतु रशियामध्ये, हे गणित सोडविले गेले असून, तेथे गोदाम पावतीच्या उलाढालीवर शासनाने आता कोणतेही कर लावलेले नाहीत. भविष्यात बाजारपेठांमध्ये गोदाम पावत्यांचा वाढता वापर हा कायदेशीर चौकटीत केलेल्या सुधारणा आणि बाजारातील विविध सहभागीदार आणि कमोडिटी एक्स्चेंजेसकडून गोदाम पावतीच्या व्यवहारांमध्ये वाढता सहभाग यावर अवलंबून आहे..Warehouse Receipts: वित्तपुरवठ्यासाठी वस्तूंचा तारण म्हणून वापर.परवाना आणि देखरेखफिल्ड वेअरहाउसिंग म्हणजेच छोट्या क्षमतेची अथवा क्षेत्रीय स्तरावरील छोट्या गोदामांशी निगडित गोदाम व्यवसायात गोदामांशी निगडित विविध कामकाजासाठी कमी देखभालीची आवश्यकता असते. बँक अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संपार्श्विक व्यवस्थापन (CMA) आणि क्रेडिट सपोर्ट कंपन्यांमधून (CSC) एकाची निवड करू शकते.बँकेकडे संभाव्य भागीदारांच्या कामकाजाच्या मानकांचे आणि क्रेडिट विषयक किंवा आर्थिक पतविषयक परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी एक मान्यताप्राप्त प्रक्रिया असते. काही संपार्श्विक व्यवस्थापकांना किंवा मालतारण व्यवस्थापक यांना निश्चित आर्थिक पत अथवा क्रेडिट मर्यादा वाटप करण्याच्या प्रणालीबद्दल देखील माहिती असते. उदा. बँकेच्या संपार्श्विक व्यवस्थापकाकडे किंवा मालतारण व्यवस्थापकाकडे असलेले एकूण आर्थिक मर्यादेचे हक्क अमुक एक अमेरिकन डॉलर दशलक्षापेक्षा जास्त असू शकत नाही. ही एक खरेदीदाराने सावधगिरी बाळगण्यासाठी निर्माण केलेली मजबूत यंत्रणा आहे..कॉर्पोरेट किंवा खाजगी क्षेत्रातील देखरेखीव्यतिरिक्त, या कंपन्यांना बळकट करण्यासाठी शासनामार्फत महत्त्वाची पावली उचलली जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जोपर्यंत संपार्श्विक व्यवस्थापक किंवा मालतारण व्यवस्थापक वित्तपुरवठादारांसाठी संपार्श्विक म्हणजेच तारण ठेवलेले घटक सुरक्षित करण्यासाठी केवळ त्रिपक्षीय करारांद्वारे कामकाज करतात, तोपर्यंत विशिष्ट सरकारी नियमनासाठी फारसे धोरणात्मक निर्णय घेणे अथवा त्यास समर्थन देणे गरजेचे नसेल. तथापि, जेव्हा संपार्श्विक व्यवस्थापक देशाच्या वित्तीय बाजारपेठेत व्यापार करण्यासाठी गोदाम पावत्या देण्यास मोठ्या प्रमाणावर सुरुवात करेल तेव्हा खऱ्या अर्थाने परिस्थिती बदलू शकेल. परंतु अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांचे संरक्षण करणे हे सुद्धा सरकारचे आद्य कर्तव्य असून अशाप्रकारे गोदाम पावती विषयक व्यावसायिक कागदपत्रे देणाऱ्या कंपन्यांप्रमाणेच हे क्षेत्र सुद्धा वैधानिक तरतुदीद्वारे नियंत्रित करणे आवश्यक आहे.सार्वजनिक क्षेत्रातील गोदामांची परिस्थिती वेगळी असते. क्षेत्रीय स्तरावरील छोट्या गोदामांच्या वेअरहाउसिंग व्यवसायामध्ये, अर्थपुरवठा करणाऱ्या फायनान्सरकडे दुसरा पर्याय असतो, परंतु सार्वजनिक गोदामांमध्ये सामान्यतः पुरवठा साखळीत उत्तम व्यवस्थापन केले जाते आणि बऱ्याचदा काही पर्यायी यंत्रणांचा देखील वापर केला जातो. म्हणूनच बँकांनी सार्वजनिक गोदाम ऑपरेटर किती विश्वासार्ह आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे..Warehouse Receipt Use: वित्तपुरवठ्यासाठी वस्तूंचा तारण म्हणून वापर.सार्वजनिक गोदामांच्या नियंत्रणासाठी आणि देखरेखीसाठी एक सुव्यवस्थित यंत्रणा वास्तविकपणे त्यांनी दिलेल्या गोदाम पावत्या आर्थिक समुदायासाठी स्वीकारार्ह संपार्श्विक किंवा तारणयोग्य आहेत, याची खात्री करण्यास मदत करते. म्हणूनच, सार्वजनिक गोदामांना (तांत्रिक आणि आर्थिक निकषांवर) मान्यता देणे आवश्यक असून त्यानंतर त्यांच्या कामगिरीचे निरीक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. यापूर्वीच्या अनुभवावरून असे दिसून आलेले आहे की विश्वासार्ह नियामक यंत्रणेचे अस्तित्व गोदाम पावती करिता वित्तपुरवठा करताना वित्तीय संस्थांचा आत्मविश्वास वाढविते..भारत देशामध्ये नियामक यंत्रणांचा विचार केला तर वखार विकास व नियामक प्राधिकरण (WDRA), सहकार आयुक्तालय, विमा पुरवठादार कंपन्या, केंद्रीय व राज्यस्तरावरील गोदाम व्यवसायाशी निगडीत महामंडळे, तारण व्यवस्थापन कंपन्या व वित्तीय संस्था यांचा यामध्ये समावेश होतो. अशी यंत्रणा एकसमान आणि पारदर्शक पद्धतीने गोदाम पावती वित्तपुरवठा करण्यासाठी देशभरात एक सक्षम वातावरण निर्माण करण्यास मदत करते. यामुळे गोदाम पावती वापरकर्त्यांना व्यावसायिक कामकाजासाठी येणारा खर्च देखील कमी होऊ शकतो. तसेच गोदाम पावती व्यवसायात कार्यरत प्रत्येक सहभागीदार जसे की शेतकरी, खरेदीदार, प्रक्रियादार, निर्यातदार, गोदाम व्यावसायिक, वित्तपुरवठादार बँका, पतसंस्था, तारण व्यवस्थापक कंपन्या, दळणवळण क्षेत्रातील वाहतूक सेवापुरवठादार, या सर्वांचे हित जोपासले जाते. त्यामुळे गोदाम पुरवठा साखळीचे सरंक्षण झाल्याने मोठ्या संख्येने गोदाम पावतीशी निगडीत सहभागीदार आकर्षित होऊन गोदाम पावती व्यवसायास चालना मिळू शकते व कृषी क्षेत्राच्या आर्थिक उलाढालीला गती मिळून शेतकरी वर्गाची जोखीम कमी होऊन आर्थिक उत्पन्न वाढू शकते..Warehouse Receipt System: गोदाम पावतीसाठी कायदेशीर चौकटीचे महत्त्व.नियामक संस्था आणि यंत्रणांची मुख्य कार्येगोदाम परवाना प्रक्रिया सुटसुटीत व सोपी करणे आणि योग्यरीतीने अमलात आणणे.सार्वजनिक गोदामांच्या सार्वजनिक नोंदी ठेवणे.सार्वजनिक गोदामांच्या आर्थिक, कार्यालयीन कामकाजाशी निगडित, तांत्रिक परिस्थितीनुरूप साठविलेल्या वस्तूंच्या गुणवत्तेची व प्रमाणाची प्रारंभिक, नियमितपणे विशेष तपासणी करणे.जर देशात कागदीस्वरूपात भौतिक पद्धतीने गोदाम पावत्या देण्यात येत असतील तर गोदाम पावत्या छपाईसाठी ऑर्डर गोळा करणे.गोदाम ऑपरेटर, ठेवीदार आणि वित्तीय संस्थांमध्ये संघर्ष झाल्यास त्यात मध्यस्थी करणे..सरकारी संस्थांनी सार्वजनिक गोदामांसाठी परवाना प्रणाली स्पष्ट आणि पारदर्शक असावी हे निश्चित करणे गरजेचे आहे. बँकांना गोदाम परवाना प्रक्रियेत कोणत्या घटकांचा विचार केला गेला आहे, कोणत्या घटकांचा विचार केला गेला नाही हे माहिती असणे आवश्यक आहे. सार्वजनिक गोदामांचे हक्क आणि दायित्वे स्पष्ट असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, सार्वजनिक गोदाम म्हणून गोदाम परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या आर्थिक कामगिरीबद्दलची माहिती सक्षम अधिकाऱ्यांसमोर उघड करणे आवश्यक आहे. संघराज्य आणि राज्य पातळीवरील अमेरिकेतील कायदे आणि नियम हे एक चांगले मॉडेल गोदाम पावतीच्या बाबतीत नक्कीच पाहणे योग्य ठरेल. जे अनेक देशांमध्ये नियामक आणि संनियंत्रण करणाऱ्या संस्था विकसित करण्यासाठी आधार म्हणून यशस्वीरीत्या वापरले गेलेले आहेत..नियामक कार्यांसाठी सर्वोत्तम संस्थेची निवड देशाच्या परिस्थितीवर अवलंबून असते. गोदाम पावती प्रणाली असलेल्या अनेक देशांनी सार्वजनिक गोदामांच्या परवाना आणि तपासणीसाठी सरकारी नियामक एजन्सी स्थापन केल्या आहेत. बल्गेरिया आणि कझाकस्तानमधील अनुभवांनी हे दाखवून दिले आहे की एक सुसंरचित आणि कार्यक्षम सरकारी नियामक एजन्सी गोदाम पावती प्रणालीवर विश्वास निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.