Village Festival: वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ग्रामजयंती महोत्सव सोहळ्यास बुधवार (ता. एक) पासून प्रारंभ होत आहे..राष्ट्रसंत तुकडोजी विचार प्रतिष्ठान मानस मंदिरतर्फे या महोत्सवाचे आयोजन केल्या जाते. राष्ट्रसंत तुकडोजी यांच्या इच्छेनुसार गावागावात हा कार्यक्रम विविध ग्रामविकासाचे उपक्रम राबवित साजरा केला जातो. या वर्षी जिल्ह्यातील विविध ३० गावांत विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहे. सार्वजनिक पुतळा स्वच्छता व पूजन करीत या महोत्सवाचा आरंभ होत असतो. .Shivaji Maharaj Jayanti: जुन्नरला ‘हिंदवी स्वराज्य’ महोत्सवास सुरुवात.तसेच गाव सफाई, सर्वधर्म ग्रंथदिंडी, ग्रामगीता वाचन, ध्यान, सामुदायिक प्रार्थना व अन्य उपक्रम आयोजित करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण, दारूबंदी, महिला सक्षमीकरण, प्रदूषण मुक्ती, शेतीप्रश्न, इंधन समस्या व अन्य विषयांवर मार्गदर्शन केल्या जाणार आहे..ग्रंथवाचन व उत्पादक श्रमदान विविध ठिकाणी संपन्न होणार. १ ते ३० एप्रिलदरम्यान असलेले महापुरुषांचे जयंती कार्यक्रम तसेच धार्मिक उत्सव स्वतंत्रपणे साजरे केल्या जातील. भजनाचे कार्यक्रम सायंकाळी पार पडतील. वडध, निंबोली, पिंपळगाव, साळफळ, विरूळ, निजामपूर, नेरी, खुबगाव, खरांगणा, देवळी, .Nathacha Ranjan Ritual: ‘नाथांचा रांजण’ भरण्याच्या पारंपरिक सोहळ्याला प्रारंभ .अक्षय शांतिधाम, रामनगर खापा, मदनी आमगाव, आर्वी व अन्य गावांत स्थानिक गुरुदेव सेवक उपक्रम राबविणार आहेत. समारोप कार्यक्रम २९ व ३० एप्रिल रोजी मानस मंदिरात होईल, अशी माहिती ग्रामजयंती महोत्सव समिती संयोजक मयूर ढुमणे यांनी दिली. आयोजन समितीचे हभप पुण्यदास चरडे, विजयराव मंथनवार, वसंतराव ठाकरे, गंगाधर जगताप, शालिग्राम वानखेडे, प्रल्हाद गोलाईत, शोभा जाधव, .प्रशांत महाराज मानमोडे, वसंत भांडेकर, हरिभाऊ बेलोणकर, प्रा. घनश्याम चौधरी, गजानन बोबडे, प्रफुल्ल इंगोले,बाळासाहेब धनवटे, लताताई ठाकरे, माधवी साबळे, वीणा भोयर, प्रकाश वैद्य, सुमित्रा डम्भे, किशोर फरताडे, मधुकर वाघमारे, नामदेवराव काळे महाराज, गजानन डेबे, मदन जाधव, सुशील वढतकर, रवींद्र टप्पे, मारोती बरडे,अविनाश पाटसकर,त्रिशा आष्टेकर, उत्तमराव फरताडे आदींनी उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.