Warana River Drying Update: वारणा नदीची पाणीपातळी कमालीची खालावल्याने वारणाकाठावर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून नदीपात्रातील पाणी कमी झाल्याने अनेक ठिकाणी नदी कोरडी पडली आहे. याचा फटका शेतीच्या सिंचनासह नदीवर अवलंबून असलेल्या पिण्याच्या पाणी योजनांनाही बसला आहे. अनेक गावांचा पाणीपुरवठा बंद झाल्याने नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे..वारणा धरणातून गुरुवारपर्यंत ५०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू होता. नदीतील पाणीपातळी घटल्याने शुक्रवारपासून विसर्ग वाढवून ११०० क्युसेक्स करण्यात आला. मात्र, विसर्ग वाढवूनही नदीपात्रातील पाणीपातळीत अपेक्षित वाढ झालेली नाही..Warana River Water Level: ऐन पावसाळ्यात वारणा नदी तळाला.त्यामुळे धरणातून पाणी सोडूनही नदी कोरडी का, असा प्रश्न शेतकरी आणि ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे. नदीतील पाणी कमी झाल्याने पाणी उपसा करणाऱ्या योजनांचे इंटेकवेल उघडे पडले आहेत. परिणामी, पाणी उपसा करण्यात अडचणी येत असून काही गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे..Pune Water Shortage: तलावांतील पाणी उपशावर निर्बंध.शेतीच्या सिंचनासाठीही पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने पिकांना पाणी देण्याचे नियोजन कोलमडले आहे. विसर्ग वाढविण्याबरोबरच नदीच्या प्रवाहात पाणी प्रत्यक्ष पोहोचते का, विविध ठिकाणी किती पाणी उपसा होते आणि पाणी योजनांपर्यंत पुरेसा प्रवाह टिकतो का, याची तपासणी आवश्यक आहे..धरण प्रशासन, पाटबंधारे विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी समन्वयाने परिस्थितीचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याची गरज आहे. पाणीटंचाई अधिक तीव्र होण्यापूर्वी प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून वारणाकाठच्या गावांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.