Yavatmal News: वणी बाजार समितीत कापूस खरेदी प्रक्रियेतील अनियमिततेचा गंभीर प्रकार सोमवारी (ता. २३) उघड झाला. चांगल्या दर्जाचा कापूस असतानाही तो नाकारल्याच्या धक्क्याने बोर्डा येथील एका शेतकऱ्याने थेट विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. .या घटनेमुळे बाजार परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर हाच कापूस चांगल्या दर्जाचा असल्याचे सांगत खरेदी करण्यात आला..Farmers Issues: जळगाव, धुळ्यात कमी उत्पादनामुळे शेतकरी अडचणीत.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शेतकरी आपला कापूस विक्रीसाठी बाजार समितीत घेऊन आला होता. हमीभावाने खरेदी सुरू असताना सीसीआयच्या ग्रेडरकडून त्याचा कापूस निकृष्ट ठरवून खरेदीस नकार देण्यात आला..Farmer Issues: योजनांच्या नावाखाली शेतकऱ्यांची आर्थिक लूट.शेतकऱ्याने वारंवार विनंती करूनही अधिकाऱ्यांनी भूमिका बदलली नाही. आधीच उत्पादन खर्च, मजुरी, वाहतूक आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्याचा मानसिक तोल ढासळला आणि त्याने खिशातील विषाची बाटली काढून प्राशन करण्याचा प्रयत्न केला..यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकर यांनी शेतकऱ्याच्या हातातील विषाची बाटली हिसकावून घेतली. तसेच, त्याच्यासाठी तातडीने वैद्यकीय मदतीची व्यवस्था केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.