Ahilyanagar News: राहुरी, अहिल्यानगर, पाथर्डी आणि नेवासा तालुक्यांतील सुमारे ४३ गावांतील १०२ पाझर तलाव भरून देण्यासाठी मुळा धरणातून सोडण्यात आलेल्या वांबोरी चारीची पाइपलाइन सोमवारी (ता. ९) फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. पाइपलाइनच्या पाण्यामुळे शेतीपिकांचे आणि शेतीचे नुकसान झाले आहे. .या चार तालुक्यांतील ४३ गावांत १०२ पाझर तलाव भरून सुमारे साडेतीन हजार हेक्टर क्षेत्राला वरदान ठरलेली, वांबोरी चारी ४ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे चारीवर रब्बीसह उन्हाळी पिकांची भिस्त असते..Agri Pipeline: तीन फुटांच्या खाली शेतकऱ्याचा त्यांच्या जमिनीवर अधिकार असतो?.सोमवारी राहुरी तालुक्यातील धामोरी खुर्द येथे अचानक मोठा आवाज होऊन, १८०० एमएम व्यासाची जलवाहिनी फुटली. एकाचवेळी तीन पंपांचा फ्लो असल्याने ३० फूट उंचीवर पाण्याचा फवारा उडाला. या घटनेत परिसरातील सुमारे दहा ते बारा एकर क्षेत्रात पाणी जाऊन नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पाइपलाइन फुटल्याने लाखो लिटरहून अधिक पाणी वाया गेले. शिवाय पाण्यामुळे शेतीचे आणि शेतीपिकाचेही नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे..MIDC Water Pipeline : ‘कागद’च्या जलवाहिनीसाठी तब्बल ३५६ कोटींची निविदा.अवर्षणप्रवण भागासाठी ही चारी वरदान आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे सुमारे १२ गुंठे रान वाहून गेले असून, १२ एकरांवर क्षेत्र पाण्याखाली गेले. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. दरम्यान मुळा विभागाच्या टीमने घटनास्थळी पाहणी केली. वांबोरी चारी सुरू केल्यानंतर टप्याटप्याने तीनही पंप सुरू केले जातात. १०० अश्वशक्तीचे तीन पंप असून, एका पंपातून सुमारे २५ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होतो. त्यानुसार तीन पंपातून ७५ क्युसेक वेगाने पाणी बाहेर पडते..दुरुस्तीला लागणार सात दिवसांचा कालावधी...वांबोरी चारीची सुमारे १८०० एमएम व्यासाची जलवाहिनी फुटल्यानंतर तीस फूट उंचीपर्यंत पाण्याचा कारंजे उडाले. जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच, तत्काळ पंप बंद करण्यात आली. ही लाईन १५ वर्षे जुनी आहे. त्यामुळे ती फुटली असावी. पाणी आटण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतील. त्यानंतर प्रत्यक्ष दुरुस्ती पूर्ण होण्यासाठी सात दिवस लागू शकतील, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.