Wardha News: अतिवृष्टी, पावसाची संततधार, ढगाळ वातावरण यामुळे बहुतांश भागांत पीक गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. काही शेतकऱ्यांना थोडेफार उत्पादन मिळाल्याचे समाधान असले तरी बाजारात भाव नसल्याने त्यांच्याही पदरात काही पडेल, ही अपेक्षा फोल आहे. एकंदरीतच शेतकऱ्यांची स्थिती लक्षात घेता त्यांना संपूर्ण कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेकडून (शरद जोशी) करण्यात आली आहे..विदर्भासह राज्याच्या विविध भागांत पावसाची संततधार सुरू आहे. पीक कापणीच्या अवस्थेत असताना सातत्याने पाऊस कोसळत असल्याने पिकाची पूर्णपणे वाताहात झाली आहे. सोयाबीनमध्ये हुमणीसह चक्रीभुंगा, खोडकीडीचा प्रादुर्भाव काही भागांत आढळला आहे. ढगाळ वातावरणाचा फटका इतरही पिकांना बसल्याने त्याच्या नियंत्रणासाठी शेतकरी वारेमाप खर्च करीत असल्याचे चित्र आहे..Shetkari Karjmafi: शेतकरी कर्जमाफी योग्य वेळी देण्याचे अर्थमंत्र्यांचे पुन्हा आश्वासन. मात्र या साऱ्या प्रयत्नांतून त्यांच्या हाती काही लागेल, अशी आशादायक स्थिती नाही. नशिबवान ठरलेल्या काही शेतकऱ्यांच्या हाताला काही किलो किंवा क्विंटल माल लागला तरी बाजारात भाव नसल्याने त्यांच्याही उत्पादकता खर्चाची भरपाई होईल, असे वाटत नाही. परिणामी शेतकऱ्यांना पुढील हंगामाचे नियोजन करताना आता सावकाराचेच उंबरठे झिजवावे लागतील, अशी परिस्थिती आहे. .त्यामुळेच शासनाने शेतकऱ्यांच्या एकंदरीत स्थितीचा विचार करता निवडणूकपूर्व दिलेल्या संपूर्ण कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदन देतेवेळी दाणी, अरविंद राऊत, गणेश मुटे, सारंग दरणे, मुकेश धाडवे, खुशाल हिवरकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. .Farmers Relief: ‘त्या’ २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या.अतिवृष्टीच्या निकषात बदल कराएनडीआरएफच्या निकषानुसार पूर्वी प्रति हेक्टर १३,६०० रुपये भरपाई मिळत होती. त्यात बदल करून आता ६,८०० रुपये इतकी अत्यल्प भरपाई दिली जाते. त्यातही भरपाईसाठी पूर्वीच्या तीन हेक्टरच्या मर्यादेत कपात करून ती दोन हेक्टर इतकी केली आहे. म्हणजेच बहुभूधारक शेतकऱ्यांना मागील सरकारच्या काळात ४०,८०० रुपये मदत मिळत होती ती आता १३,६०० इतकी अत्यल्प मिळणार आहे. त्यामुळे पूर्वीच्याच निकषानुसार भरपाईची मागणीदेखील करण्यात आली आहे..शासनाच्या आयात-निर्यात धोरणाचा फटका बसत शेतीमालाचे भाव घसरले आहेत. पीक नुकसान भरपाईच्या निकषात बदल करून शासनाने त्यांच्या अडचणीत भर टाकण्याचेच काम केले आहे. एकंदरीतच शेतकऱ्यांची स्थिती विदारक असताना शासनाने आश्वासनाची पूर्तता करीत कर्जमाफी दिली पाहिजे.सतीश दाणी, राज्य अध्यक्ष, शेतकरी संघटना (युवा आघाडी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.