Best time to see flamingos at Ujani: उजनी धरणात यंदा मुबलक पाणीसाठा असल्याने, दर वर्षी हिवाळ्यात येणाऱ्या बहुतांश परदेशी पक्ष्यांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या फ्लेमिंगो (रोहित) आणि पट्टकादंब यांसारख्या प्रमुख स्थलांतरित पक्ष्यांनी अद्यापपर्यंत येथे हजेरी लावली नसल्याचे दिसत आहे.