Solapur News: बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती शासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवली आहे. उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल आहे. सोलापूर जिल्हा परिषदेतील दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे ४९७ कर्मचाऱ्यांना नोकरी मिळाली असून आतापर्यंत ३८१ कर्मचाऱ्यांची पडताळणी करण्यात आली आहे. तर उर्वरित कर्मचाऱ्यांची पडताळणी सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले..बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे जे कर्मचारी दिव्यांग प्रमाणपत्र देऊन सेवेत रुजू झाले आहेत, त्यांची पुन्हा पडताळणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेकडील विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या पडताळणीच्या सूचना दिल्या आहेत..Satelite Crop Verification: ‘एमआरसॅक’ प्रणालीने केळी पिकाची पडताळणी.यामध्ये शिक्षण विभागाकडील ३९३ पैकी ३८१ जणांच्या प्रमाणापत्राची पडताळणी पूर्ण झाली असून अद्याप १२ जणांच्या प्रमाणपत्रांची पडताळणीचा अहवाल प्राप्त झाला नाही. ग्रामपंचायत ३८, आरोग्य २३, सामान्य प्रशासन विभाग १९, पशुसंवर्धन ७, बांधकाम व कृषी विभागाच्या प्रत्येकी ५ कर्मचाऱ्यांची पडताळणी करण्याच्या आदेश दिले आहेत. पण, अद्याप अहवाल अप्राप्त आहे..Verification measuring instruments: मोजमाप उपकरणांच्या पडताळणीची मुदत आता २४ महिने.जे. जे. हॉस्पिटलकडून तपासणीज्या कर्मचाऱ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळवली आहे, त्या कर्मचाऱ्यांना आता जे. जे. हॉस्पिलटलकडून तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. .त्यानुसार आतापर्यंत ३८१ शिक्षण विभागातील शिक्षकांनी तपासणी करून घेतली आहे. अद्याप ११६ कर्मचाऱ्यांचा तपासणी अहवाल अप्राप्त आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.