Jalgaon News : खानदेशात मागील दोन तीन दिवसात जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, जामनेर, मुक्ताईनगर, बोदवड भागात पावसाने कहर केला. यात वाघूर धरण दोन दिवसात ६१ टक्क्यांवरून १०० टक्के भरले. .वाघूरचे सर्व २० वक्राकार दरवाजे मंगळवारी (ता.१६) उघडण्यात आले. वाघूरमधून मंगळवारी दुपारी ६० हजार क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग सुरू होता. वाघूरनदीने पात्र सोडले. यामुळे जळगाव तालुक्यातील नशिराबाद व भुसावळातील सुनसगाव यादरम्यानचा वाघूर नदीवरील पूल पाण्याखाली गेला. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. वाघूरनदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता..Dam Water Release : दारणा, गंगापूर, पालखेड धरणांतून विसर्गात घट.गिरणातूनही विसर्गगिरणा धरणही १०० टक्के भरल्याने त्यातून विसर्ग सुरू करण्यात आला. त्याच्या सहा दरवाजांतून विसर्ग सुरू करण्यात आला. तसेच पाचोरा तालुक्यातील बहुळा प्रकल्पदेखील भरल्याने त्यातूनही मंगळवारी विसर्ग सुरू झाला..गिरणा, बहुळा, वाघूर नद्या दुथडी भरून वाहत आहेत. भुसावळनजीकच्या तापी नदीवरील हतनूर धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. त्याच्या १६ दरवाजांमधून मंगळवारी विसर्ग सुरू होता. गिरणा नदीतून मागील महिन्यातही विसर्ग सुरू होता. गिरणा नदी मागील काही दिवसांपासून प्रवाही आहे. तसेच तापी नदी सुमारे अडीच महिने प्रवाही आहे..Dam Water Release : जायकवाडी धरणातून थांबविलेला विसर्ग पुन्हा सुरू.अनेक भागांत तूरळक, अल्प पाऊसजिल्ह्यातील दक्षिण भागासह मुक्ताईनगरात अतिपाऊस झाला. पण जळगाव, चोपडा, यावल, रावेर या भागात अल्प, तुरळक पाऊस दोन दिवस झाला आहे. मध्येच ढगांचा गडगडात व्हायचा. पण जोरदार, चांगला पाऊस कुठेही झाला नाही. .काही भागात सूर्यदर्शनही झाले. तसेच सुसाट वारादेखील होता. बुधवारी (ता. १७) सकाळी जळगाव, यावल तालुक्यातील आसोदा, ममुराबाद, विदगाव, यावलमधील थोरगव्हाण, पिळोदा, पथराड आदी भागात पाऊस झाला. पण काही वेळेत पाऊस थांबला. मध्यम ते हलका पाऊस होता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.