Palghar agriculture News: वाणगाव : निसर्गाचे बदललेले ऋतुचक्र, अवकाळी, अतिवृष्टी या नैसर्गिक संकटांबरोबरच मजुरांचा तुटवडा ही प्रमुख समस्या सातत्याने जाणवत आहे. खर्च केलेले पैसेसुद्धा वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांसह युवा तरुण पिढी शेतीकडे दुर्लक्षित झाली आहे, मात्र वाडा तालुक्यातील वाडा कोलम भौगोलिक सहकारी शेती संस्थेने हार्वेस्टरद्वारे भातकापणीचे प्रात्यक्षिक दाखविले. त्यामुळे सहकाराच्या माध्यमातून कमी खर्चात आणि वेळेत कापणी शक्य होण्याची अपेक्षा आहे..शेतीतील उत्पादनात वाढ आणि नैसर्गिक संकटांवर मात करण्यासाठी शेतीला यांत्रिकीकरणाची गरज आहे. अवकाळीचे संकट आणि नुकसानीला शेतकरीवर्ग बळी पडत आहे. पालघर जिल्ह्यात रोजगारासाठी अनेक कंपन्या उभ्या असल्याने तरुणाईचा ओढा हा शहराकडे असल्याचे चित्र आहे. .Farm Mechanization: यांत्रिकीकरणाची खीळ काढा.मजुरांचा तुटवडा, वाढती मजुरी, अवकाळी अशी संकटे सातत्याने जाणवत असल्याने शेती मागे पडत चालली आहे. आधुनिक शेतीला यांत्रिकीकरणाची जोड देणे आवश्यक आहे. .Farm Mechanization: शेतीत वापर आधुनिक यंत्रसामग्रीचा!.वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी संस्थेने हरियानामधून भातकापणी यंत्र आणले आहे. यंत्र चालवण्यासाठी उत्तर प्रदेशातून चालक मागविण्यात आला आहे..मनुष्यबळ वाचण्यासाठी मदतपिकांची कापणी करणे हे सर्वाधिक मनुष्यबळ लागणारे व वेळखाऊ काम आहे. एकूण पीक व्यवस्थापनात लागणाऱ्या मजुरांच्या सुमारे २५ टक्के मजूर कापणीमध्ये लागतात. आजही माणसांच्या साह्याने विळ्यासारख्या साधनाने भातकापणी केली जाते, मात्र हंगामाच्या अखेरीला सर्वांची काढणी साधारण एकाच काळात येत असल्यामुळे मजुरांची मोठी कमतरता भासते. जास्त मजुरी देऊनही वेळेवर मजूर मिळतील, याची शाश्वती नसते. त्यामुळे कापणी, मळणीसाठी शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाकडे वळणे आवश्यक आहे..मजुरांचा तुटवडा, अवकाळीचे संकट सातत्याने जाणवत असल्याने शेती मागे पडत चालली आहे. आधुनिक शेतीला यांत्रिकीकरणाची जोड देणे आवश्यक आहे. कृषी यांत्रिकीकरण काळाची गरज बनली आहे.- किरण पाटील, सदस्य, वाडा कोलम भौगोलिक सहकारी शेती संस्था, वाडा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.