Sangl News: सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकांसाठी गुरुवारी (ता. १५) सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या पहिल्या दोन तासांत केंद्रावर फारशी गर्दी नव्हती. महापालिकेच्या २० प्रभागांतील ७८ जागांसाठी ५२७ केंद्रांवर दुपारी दीडपर्यंत २९.३० टक्के मतदान झाले. दुपारी चारपर्यंत किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले..सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकांसाठी २० प्रभागांतील ७८ जागांसाठी ३८१ उमेदवारांचे ५२७ केंद्रांवर राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. निकाल शुक्रवारी (ता. १६) जाहीर होणार आहे. त्यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..Local Body Election: गोंधळात मतांचा टक्का घसरण्याची भीती.सकाळच्या टप्प्यात बहुतांश मतदान केंद्रांवर मतदानासाठी फारशी गर्दी नव्हती. साडेदहा नंतर साडेदहा नंतर बहुतांश मतदान केंद्रांवर गर्दी झाली. त्यानंतर दुपारी एकपासून अनेक केंद्रांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून आला नाही. प्रभाग २, ११, १२, १३, १४, १६, या ठिकाणी मतदानासाठी प्रचंड ईर्षा पाहायला मिळाली. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासांत ६.४५ टक्के मतदान झाले..सांगलीवाडी, वडर कॉलनी, जामवाडी, संजयनगर यासह अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या. नव मतदारांचा मोठा उत्साह दिसून आला. दुपारनंतर मतदानासाठी केंद्रावर कमी अधिक गर्दी होती..Local Body Elections: सोलापुरात ‘आयात’ नेत्यांच्या जोरावर भाजपची मोर्चेबांधणी.मतदारांना स्लिपवर खोली क्रमांक देण्यात आला होता. मात्र अनेक ठिकाणी खोली क्रमांक कुठून सुरू होतो हे माहिती नसल्याने मतदारांना केंद्रावर सर्व वर्ग फिरावे लागत होते. पोलिसांनाही याची माहिती नसल्याने मतदारांचा गोंधळ उडत होता. स्लिपवरील खोली क्रमांक शोधण्यासाठी हेलपाटे मारावे लागत होते..नाव एकाचे, फोटो दुसऱ्याचाशासनाकडून वाटप करण्यात आलेल्या मतदार स्लिपवर नाव एकाचे अन् फोटो कुटुंबातील दुसऱ्या सदस्याचा असल्याचे दिसून आले. नाव आईचे अन् फोटो मुलाचा असा प्रकार गावभागातील एका केंद्रावर होता. मतदार आईला घेऊन मतदान केंद्रावर गेल्यानंतर हा प्रकार तेथील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आला. या मतदाराचे नाव ऑनलाइन दिसत नव्हते, मात्र मतदार यादीत त्यांचे नाव कर्मचाऱ्यांना आढळल्याने त्यांनी मतदानाचा हक्क बजावला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.