Mumbai News: दीर्घ काळानंतर पार पडलेल्या राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये मतदान करण्याकरिता ग्रामीण भागातील मतदारांचा उत्साह दिसून आला. शनिवारी (ता. ७) झालेल्या या निवडणुकांसाठी मतदारांना मतदानकेंद्रांपर्यंत आणण्याची राजकीय पक्षांची कसरतही या निमित्ताने दिसून आली. सोमवारी (ता. ९) मतमोजणी होणार आहे. .राज्यभरात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ५२.२८ टक्के मतदान झाले. अर्थात, या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे. सकाळच्या टप्प्यात मतदानाचा मंदावलेला वेग दुपारनंतर वाढला. ‘मिनी मंत्रालय’ समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेवरती सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला होता..त्यामुळे निवडणुका चुरशीच्या झाल्या. ज्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली नाही, तेथे राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली होती. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे ५ फेब्रुवारी रोजी होणारी निवडणूक दोन दिवसांनी पुढे ढकलण्यात आली होती..Mayor Elections: महापौर निवडणुकांत भाजपची सरशी; आठ महापालिकांच्या चाव्या हातात .शनिवारी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. राज्यात अनेक ठिकाणी मतदार यादीमध्ये घोळ असल्याचे समोर आले असून अनेकांची नावेच यादीत नसल्याने त्यांना धावपळ करावी लागली. तर काही ठिकाणी किरकोळ वादावादीचे प्रसंग समोर आले असून काही ठिकाणी उमेदवारांना धमकावण्याचा प्रकारही घडला..कोल्हापूर जिल्ह्यात चुरशीने निवडणूक झाली असून, काही ठिकाणी तिरंगी व चौरंगी लढती झाल्याने निवडणुकीत रंगत आली होती. प्रचाराला वाढीव दिवस मिळाल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना मिळालेली संधी आणि उमेदवारांची वाढलेली संख्या यामुळे सकाळपासूनच वेगाने मतदान झाले. सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ६८ जागांसाठी २७१ उमेदवार रिंगणात होते. येथे सकाळपासूनच मतदानाचा वेग चांगला होता. किरकोळ बाचाबाचीचे प्रसंग वगळता मतदान शांततेत पार पडले..Local Body Elections: परभणीत ‘झेडपी’, पंचायत समितीसाठी आज मतदान.छत्रपती संभाजीनगरमध्ये सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ, माजी मंत्री अब्दुल सत्तार, खासदार संदिपान भुमरे, माजी खासदार रावसाहेब दानवे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. येथे छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, पैठण आणि सिल्लोड तालुक्यांत मतदानाचा वेग चांगला होता. शिवसेनेचे दोन गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीसह ‘एमआयएम’नेही या निवडणुकीत ताकद लावल्याने रंगत आली होती. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराएवजी भावनिक आवाहन केले..लातूरमध्ये सकाळच्या टप्प्यात मतदानाचा वेग चांगला होता, मात्र दुपारनंतर अनेक ठिकाणी मतदारांना आग्रह करत केंद्रावर आणावे लागले. दुपारी साडेतीनपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच ५८.८१ टक्के तर पाठोपाठ रायगड जिल्ह्यामध्ये ५७. ७७ टक्के मतदान झाले. रत्नागिरी आणि सोलापूर जिल्ह्यात मतदानाचा वेग कमी होता तर अन्य जिल्ह्यांमध्ये चुरशीने मतदान झाले. सुट्टीच्या दिवशी मतदान आल्यामुळे परगावी असलेल्या मतदारांना आणण्याची अनेक ठिकाणी उमेदवारांनी सोय केली होती..दुपारनंतर मतदानाला वेगशनिवारी सकाळी मतदान प्रक्रियेची सुरुवात काहीशी संथ गतीने झाली असली, तरी दुपारी चांगलाच वेग पकडला. अनेक ठिकाणी मतदार आपली कामे आटोपून मतदान केंद्रांवर गर्दी करताना दिसले, तर बऱ्याच ठिकाणी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आग्रह करून मतदारांना केंद्रापर्यंत आणण्याचा खटाटोप केला..दुपारी साडेतीनपर्यंतची टक्केवारी होती अशीकोल्हापूर ५८.८१रायगड ५७.७७रत्नागिरी ४७.३७सिंधुदुर्ग ५०.१०पुणे ५१सातारा ५१.२सांगली ५१.४७सोलापूर ४७.६६छत्रपती संभाजीनगर ५१.५२परभणी ५५.७१धाराशिव ५०.७लातूर ५०.२.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.