Parbhani News: परभणी जिल्ह्यातील ७ आणि हिंगोली जिल्ह्यातील २ नगर परिषदांसाठी मंगळवारी (ता. २) सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान घेण्यात आले. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत परभणीत सरासरी टक्के ५२.९८तर हिंगोलीत सरासरी ५२.०१ टक्के मतदान झाले होते. रविवारी (ता. २१) मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत..परभणी जिल्ह्यातील जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पूर्णा या ७ नगर परिषदांसाठी मिळून एकूण २७२ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. मंगळवारी (ता. २) साडेतीनपर्यंत एकूण २ लाख ४८ हजार ५१७ पैकी १ लाख ३१ हजार ६५८ (५२.९८ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. .Local Body Elections: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहा नगर परिषद, एका नगरपंचायतसाठी होणार निवडणूक .त्यात जिंतूरमध्ये ५५.२८ टक्के, सेलू ५१.३६ टक्के, मानवत ४९.३ टक्के, पाथरी ५८.६५ टक्के), सोनपेठ ६२.४५ टक्के, गंगाखेड ४८.३ टक्के, पूर्णा तालुक्यात ४७.२ टक्के मतदान झाले होते. त्या वेळी मतदान करणाऱ्या पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त होती. अनेक केंद्रांवर सकाळपासून मतदारांनी रांगा लावून उत्साहात मतदान केले..local Body Elections: नगर परिषद निवडणुकीत सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा .हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली व कळमनुरी नगर परिषदांसाठी एकूण १०५ मतदान केंद्रांवर मतदान झाले. दुपारी साडेतीनपर्यंत एकूण ९४ हजार ९१४ पैकी ४९ हजार ३६८ मतदारांनी (५२.०१ टक्के) मतदान केले. त्यात हिंगोली येथे ५०.८८ टक्के तर कळमनुरी येथे ५५.५६ टक्के मतदान झाले. .या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांमध्येच लढत आहे. काही ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत लढत आहे. परभणीत पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्यासह सत्ताधारी आमदारांसाठी तर हिंगोलीत सत्ताधारी महायुतीतील आमदारांसाठी ही निवडणूक वर्चस्वासाठी महत्त्वाची ठरणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.