Maharashtra Assembly Election : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यासह अमरावती, लातूर आणि छ. संभाजीनगरमध्ये मतदानावर बहिष्कार

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत असतानाच नेत्यांसह उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. ठाण्यासह अमरावती, लातूर आणि छ. संभाजीनगरमध्ये मतदारांचा मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
Maharashtra Assembly Election
Maharashtra Assembly ElectionAgrowon
Published on
Updated on

Pune News : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले असून दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३२.१८ टक्के मतदान झाले आहे. दरम्यान राजकीय नेत्यांसह अनेक सेलिब्रेटीज यांनी मतदारांना मतकदान करा असे आवाहन केले आहे. मात्र ठाण्यासह अमरावती, लातूर आणि छ. संभाजीनगरमधील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. यामुळे राजकीय पक्ष, नेते आणि उमेदवारांची धाकधुक वाढली आहे.

ऐन मतदाना दिवशी अमरावतीच्या मेळघाटमधील आदिवासींनी मूलभूत सुविधा मिळत नसल्याच्या कारणाने मतदानावर बहिष्कार टाकला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून सहा गावांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मेळघाट परिसरातील रंगूबेली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खामदा, किन्हीखेडा, धोकरा, कुंड आणि खोकमार या सहा गावांनी मूलभूत सुविधा मिळत नसल्याचे म्हटले आहे.

Maharashtra Assembly Election
Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात लोकशाहीचा लोकोत्सव, ११ वाजेपर्यंत १८.१४ टक्के मतदान; अनेक ठिकाणी मशीनमध्ये बिघाड

या सहाही गावांमध्ये १ हजार ३०० मतदार असून पाणी, रस्ते, नाल्या, वीज नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तर सुविधा देण्याबाबत केवळ घोषणाच राजकारणी देत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. तर मतदारांनी, आधी सुविधा द्या, नंतर मतदान करू अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान दोन दिवसांपासून गावात याबाबत बॅनर लावून सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता.

ग्रामस्थांच्या या भूमिकेनंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून आता रंगूबेली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सहा गावांमध्ये गेली आहे. तसेच ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे. आता प्रत्यक्षता मतदान सुरू झाले असून एक देखील ग्रामस्थ मतदान केंद्रावर पोहचलेला नाही

Maharashtra Assembly Election
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के, झारखंडमध्ये १२.७१ टक्के मतदान

लातूरच्या टेम्भूर्णीकरांचा बहिष्कार

राज्यात सध्या मतदानाची प्रक्रिया पार पडत असून अनेक मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडत आहेत. मात्र लातूर जिल्ह्यातील टेम्भूर्णी गावातील नागरिकांनी गावात सुविधा पुरविल्या जात नसल्याचा आरोप करताना बहिष्कार टाकला आहे.

मतदान केंद्रावर शुकशुकाट

अमरावती मेळघाटासह लातूर जिल्ह्यातील टेम्भूर्णी गावातील नागरिकांनी बहिष्कार टाकला असतानाच छ. संभाजीनगरच्या रामनगर गावाने देखील मतदानावर बहिष्कार टाकला आहे. तर गावकऱ्यांनी पायाभूत सुविधा नसल्यामुळे मतदानावर बहिष्कार टाकत असल्याचे जाहीर केले आहे.

मुख्यमंत्र्याच्या ठाण्यातच बहिष्काराचे अस्त्र

ऐन निवडणुकीच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात बहिष्काराचे अस्त्र बाहेर आले आहे. येथील बौद्ध आणि वाल्मिकी समाजानं मुख्यमंत्री शिंदे यांनी समाजाच्या प्रश्नांकडं कानाडोळा केल्याचा दावा केला आहे. तर घराचा प्रश्न, बुद्धविहार बांधण्याचा प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यावरून समाजाने विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दलित पँथरनं दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com