Voter List Update: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी (ता. ११) पालिका मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक आणि दोषमुक्त करण्यासाठी या बैठकीत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली..या बैठकीस एसआयआर अभियानाचे प्रदेश संयोजक किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर, महापौर नितीन पाटील यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते..Electoral Roll Revision: कळंब तालुक्यात मतदार याद्यांचे पुनरीक्षण वेगात.तसेच, या बैठकीला सभागृहनेते प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, नगरसेवक परेश ठाकूर, रवींद्र भगत, सुमित झुंझारराव, अजय बहिरा, शशिकांत शेळके, प्रीती जॉर्ज, अस्मिता घरत, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटये,.Association Election: अडते असोसिएशनच्या निवडणुकीत ८०१ मतदार .जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. संबंधित नोंदींचा वापर मतदार यादी शुद्धीकरण मतदार प्रक्रियेत कसा प्रभावीपणे करता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले..उपाययोजनांची आखणीबैठकीदरम्यान मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, पुनर्पडताळणी आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची आखणी करण्यात आली. मतदार यादीतील अवैध नोंदी रोखणे, मृत व्यक्तींची नावे वगळणे, स्थलांतरित नागरिकांची माहिती अद्ययावत करणे तसेच पात्र नागरिकांची नोंदणी सुनिश्चित करणे यावर भर देण्यात आला. यासोबतच मागील काही काळात महापालिका हद्दीत वितरित केलेल्या जन्म आणि मृत्यू दाखल्यांच्या अनुषंगानेही चर्चा करण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.