ठळक मुद्देप्रारुप मतदार यादीवर ८ ते १४ ऑक्टोबर २०२५ दरम्यान हरकती आणि सूचना दाखल करता येणारअंतिम मतदार यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर होईलस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत.Maharashtra Local Body Elections : राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार प्रारुप मतदार यादीवर ८ ते १४ ऑक्टोबर २०२५ दरम्यानच्या कालावधीत हरकती आणि सूचना दाखल करता येणार आहेत..राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ ही अधिसूचित तारीख निश्चित केली आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीचा जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी वापर होईल. जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यावर १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील. यासाठी अंतिम मतदार यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर केली जाणार आहे..ZP Pune Election: पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी महायुतीत मोठी चुरस .निवडणूक विभाग आणि निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या तयार करतेवेळी विधानसभा मतदारसंघातील यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे आणि पत्ते कायम ठेवण्यात येतात. या मतदार याद्यांमध्ये नवीन नावे समाविष्ट करणे, नावे वगळणे, नावे अथवा पत्ते दुरूस्ती आदी कार्यवाही केली जात नाही. केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून झालेल्या चुका तसेच मतदाराचा चुकून निवडणूक विभाग अथवा निर्वाचक गण बदलतो, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदी प्रकारच्या दुरूस्त्या हरकती आणि सूचनांच्या अनुषंगाने केल्या जातात..दरम्यान, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात गेल्या काही वर्षापासून स्थानिक संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत दिली आहे. .ZP Election : जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी वेगाने सुरू ."महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि नगरपालिका यांच्यासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घ्याव्यात. याबाबत राज्य अथवा राज्य निवडणूक आयोगाला आणखी मुदतवाढ दिली जाणार नाही," असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे..इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणासंदर्भातच्या खटल्यामुळे २०२२ पासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. आता त्याची कार्यवाही सुरु झाली आहे. .कशी असतील राजकीय समीकरणे?दरम्यान, राष्ट्रवादीने या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यात चुरस पाहायला मिळाली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगले यश मिळवले. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी आपली ताकद दाखवली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीला भरभरून मते दिली. तर महाविकास आघाडीचा सुफडासाफ झाला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.