Vishnupuri Project Nanded: नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना पिकाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पाण्याची गरज आहे. यामुळे हळद पिकासाठी तसेच ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासाठी किमान दोन आवर्तने सोडावीत, अशी मागणी शिवसेना प्रणीत शेतकरी परिषदेचे राज्यध्यक्ष माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी केली आहे. .याबाबत श्री. धोंगडे यांनी नुकतेच (ता.११) जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांना निवेदन दिले. नांदेड व लोहा तालुक्यांतील जवळपास ३० ते ३५ गावे विष्णुपुरी सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येतात. या परिसरातील शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर हळदीची लागवड केली आहे. सध्या हळद पीक महत्त्वाच्या वाढीच्या टप्प्यात असून, त्याला पाण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे किमान दोन आवर्तने मिळाल्यास हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो..Turmeric Farming Crisis: दुष्काळाचा हळदीला फटका! वायगावमधील हळद उत्पादक शेतकरी संकटात.जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत विष्णुपुरी प्रकल्पात ६५.२५ दलघमी उपयुक्त जलसाठा उपलब्ध होता. तसेच गोदावरी नदीवरील अंतरवेली व दिग्रस या दोन्ही बंधाऱ्यांमध्ये अनुक्रमे १८ आणि २४ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. या बंधाऱ्यांतील पाणी ग्रामीण भागासाठी सोडण्यावर कोणतेही आरक्षण नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विष्णुपुरी प्रकल्प १०० टक्के भरल्यानंतर दरवर्षी रब्बी हंगामासाठी तीन ते चार आवर्तने दिली जातात..Vishnupuri Water Project : विष्णुपुरी प्रकल्प पुन्हा भरला शंभर टक्के.नांदेड शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी वर्षभरात साधारणतः २८ ते ३० दलघमीपेक्षा अधिक पाण्याची आवश्यकता भासत नाही, असेही धोंडगे यांनी म्हटले आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत रब्बी हंगामासाठी आवर्तन देण्याचा विचार केला नाही, तर लाभक्षेत्रातील हळदीचे पीक मोठ्या प्रमाणात अडचणीत येण्याची शक्यता आहे..शेतकऱ्यांनी हळद लागवडीवर मोठा खर्च केला असून, पाणी न मिळाल्यास हा खर्च वाया जाण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा. हळद पिकासाठी आणि ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासाठी किमान दोन आवर्तने सोडावीत, अशी मागणी श्री. धोंडगे यांनी केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.