Pune News : स्वातंत्र्य दिनादिवशीच जालना येथे आंदोलकाच्या कमरेत लाथ घालणाऱ्या पोलिस उपअधिक्षक अनंत कुलकर्णी यांच्याविरोधात प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले आहेत. .पालकमंत्री पंकजा मुंडे यांची गाडी अडविल्याच्या रागातून आंदोलकाला दूरवरून उडी मारत कमरेत लाथ घालणाऱ्या पोलिसउपअधिक्षक कुलकर्णी विरोधात संतापाची लाट उसळेलेली असतानाच आता बच्चू कडू यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे..Farmer's Jal Samadhi Protest : युवा शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वात गोदापात्रात आंदोलन.या प्रकरणावरून बच्चू कडू यांनी मुंडे यांच्या समूतदारपणावर टीका केली आहे. तसेच डीवायएसपींना अद्दल कशी बसवायची, याबाबतचा सूचक इशाराही बच्चू कडू यांनी दिला आहे. कडू यांच्या या प्रकरणातील प्रतिक्रियेनंतर हा विषय अजून चिघळणार असेच दिसत आहे..Bacchu Kadu: शेतकरी आत्महत्याप्रश्नी ‘सिंदूर यात्रा’ काढणार : कडू.कडू म्हणाले की, ''त्याला देखील लाथ मारली पाहिजे. त्या डीवायएसरीच्या ढुं***वर पोस्टर कसं लावायचं ते आम्ही पाहू. अशा प्रकारची मस्ती असेल, तर गांभिर्याने दखल घेऊ" मंत्री आली की, तुम्ही मतदाराला लाथ मारणार, निवडणूक आली की, त्याच्या घरापर्यंत जाणार, ते पंकजाताईंना देखील समजायला पाहिजे, अशा शब्दात कडू यांनी आपली भावना व्यक्त केली..दरम्यान, पंकजाताईंना समजायला पाहिजे. पंकजाताईंनी निषेध व्यक्त केला पाहिजे. मंत्र्यांच्या दौऱ्यात असे होत असेल, तर गंभीर आहे, असे म्हणत कडू यांनी पंकजा मुंडे यांच्यावरही टीका केली. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.