Nashik News: सह्याद्री फार्म्स आणि ब्ल्यू ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ४ फेब्रुवारीदरम्यान विनियार्ड अल्ट्रा मॅरॅथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरॅथॉन स्पर्धेत देशातील तसेच आंतरराष्ट्रीय धावपटूही सहभागी होतील. रविवार (ता.१ फेब्रुवारी)पासून सह्याद्री फार्म्स, मोहाडी येथे सकाळी साडेपाच वाजता विनियार्ड अल्ट्रा मॅरॅथॉनला सुरुवात होईल. ही मॅरॅथॉन स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुली आहे..शेतशिवारातून होणारी देशातील सर्वांत दीर्घ अंतराची ही एकमेव मॅरॅथॉन आहे. स्पर्धेचे यंदाचे चौथे वर्ष आहे. यात द्राक्ष पिकांच्या बांधा-बांधाने, सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून, पालखेड धरणाजवळून स्पर्धक धावणार आहेत..Sahyadri Farms : ‘सह्याद्री’च्या शिवारात विनियार्ड अल्ट्रा मॅरेथॉन.आतापर्यंत २०० हून अधिक अल्ट्रा रनर्स धावपटूंनी ५० किमी ते ३३८ किमी (किलोमीटर) अंतर गटात नोंदणी केली आहे. याशिवाय अन्य गटात १ हजाराहून अधिक धावपटूंची नोंदणी झाली आहे..Ultra-Processed Food : अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्न आरोग्यासाठी किती हानिकारक आहे?.या वर्षीही या मॅरॅथॉनमध्ये ३, ५, १० किमी व अल्ट्रा रनर्ससाठी ५०, ७५, १००, १६१, २२० व ३३८ किमीपर्यंतचे वेगवेगळे टप्पे ठरविण्यात आले आहेत. या मॅरॅथॉन मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना ‘आयटीआरए’ पॉइंट्स मिळणार आहेत, ज्याचा लाभ त्यांना जागतिक दर्जाच्या स्पर्धांमध्ये होईल. नागरिकांनी सहभागासाठी http:/www.sahyadrifarms.com या संकेतस्थळावर जास्तीत जास्त नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी संपर्क : ७०६६७६३७६६.आपल्या क्षमतांची आपल्यालाच ओळख पटली, तर आपला आत्मविश्वास वाढतो. मॅरॅथॉनसारखा क्रीडा प्रकार या दृष्टीने सर्वांसाठी उपयुक्त आहे. सर्व वयोगटांतील नागरिकांना, विशेषत: युवकांना आपल्या शारीरिक क्षमतांना जोखण्याची संधी देण्याची भूमिका मॅरॅथॉन या उपक्रमात आहे. याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. -विलास शिंदे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, मोहाडी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.