Solapur News : मेथवडे व संगेवाडी (ता. सांगोला) यासह आठ गावातील ग्रामस्थांनी गुरुवारी (ता. ४) शक्तिपीठ मार्गाच्या मोजणीला विरोध दर्शवून अधिकाऱ्यांना माघारी पाठवले. त्यामुळे तालुक्यात या मार्गाविरोधात वातावरण तापू लागले आहे. तालुक्यातील २१ गावांतून जाणाऱ्या शक्तिपीठ मार्गावरील फक्त चार गावांची मोजणी पूर्ण झाली आहे..शक्तिपीठ मार्ग तालुक्यातील २१ गावातून जाणार आहे. या मार्गावर ६०० हेक्टर क्षेत्रावरील ६१३ गट बाधित होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी केवळ चार गावात मोजणी पूर्ण झाली आहे, तर मेथवडे, एखतपूर, बलवडी, वझरे, यलमार, मंगेवाडी, पाचेगाव, संगेवाडी व कोंबडवाडी या आठ गावांनी मात्र मोजणीस संपूर्ण विरोध दर्शविला आहे..Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरू करण्यास मान्यता.तालुक्यातील सांगोला, कमलापूर, बामणी आणि देवकतेवाडी या चार गावांची मोजणी पूर्ण झाली आहे. तर बंडगरवाडी (चो), चोपडी, चिंचोली आणि मांजरी येथे मोजणी अंशतः झाली आहे. नाझरे, सोमेवाडी आणि चिणके येथे मोजणी सुरू आहे. मेथवडे, एखतपूर, बलवडी, वझरे, यलमार, मंगेवाडी, पाचेगाव, संगेवाडी व कोंबडवाडी या आठ गावांनी मात्र मोजणीस संपूर्ण विरोध दर्शविला आहे..गुरुवारी (ता. ४) संगेवाडी व मेथवडे येथे मोजणीसाठी अधिकारी दाखल झाले असता, शेतकऱ्यांनी एकत्र येत त्यांना मोजणी न करू देता परत पाठवले. त्यामुळे शक्तिपीठ मार्गाच्या विरोधातील चळवळ तालुक्यात दिवसेंदिवस तीव्र होत चालल्याचे चित्र निर्माण झाले आहे..Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’ बाधितांच्या सर्व हरकती फेटाळल्या.तालुक्यातील शक्तिपीठ मार्गाची स्थितीएकूण बाधित गावे २१संपादित होणारे हेक्टर क्षेत्र ६००एकूण बाधित गट ६१३ .ठळक बाबीमोजणी पूर्ण झालेली गावे सांगोला, कमलापूर, बामणी, देवकतेवाडीअंशतः मोजणी झालेली गावे बंडगरवाडी (चो), चोपडी, चिंचोली, मांजरीमोजणी सुरू असलेली गावे नाझरे, सोमेवाडी, चिणकेपूर्ण विरोध दर्शवणारी गावे मेथवडे, एखतपूर, बलवडी, वझरे, यलमार मंगेवाडी, पाचेगाव, संगेवाडी, कोंबडवाडी.सुधारित राजपत्र प्रसिद्ध होणारी गावे अजनाळे, कोळे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.