Nashik News: सोयाबीनला केंद्र सरकारने ५३२८ रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र अद्याप एकही सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. निवडणुकीत कर्जमाफीची घोषणा केली. मात्र आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा कर्जमाफी केली नाही. शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर पाडव्याच्या दिवशी बुधवारी (ता. २२) राज्यभर गावोगावी आंदोलन करण्याचा निर्णय किसान सभेच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत घेण्यात आला आहे. .अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या कठीण काळात प्रश्न गंभीर झाले असून, या प्रश्नांवर तीव्र लढा देण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने नाशिक येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राज्यभरातील २३ जिल्ह्यांतील २०० हून अधिक निवडक शेतकरी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत..Farmers Protest: बीडमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक! चुकीचे पंचनामे आणि तुटपुंज्या मदतीविरोधात किसान सभा आंदोलन पुकारणार.गुुरुवार, शुक्रवारी (ता.१६, १७) झालेल्या कार्यशाळेत किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, राज्य उपाध्यक्ष माजी आमदार जे. पी. गावित, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, राज्य अध्यक्ष उमेश देशमुख, राज्य उपाध्यक्ष सुनील मालुसरे आदी सहभागी झाले होते. या कार्यशाळेत राज्यव्यापी लढा अधिक व्यापक करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले..Farmer Protest: अतिवृष्टी, अपुरी मदत आणि रखडलेली कर्जमाफीसाठी किसान सभेचे २२ ऑक्टोबरला राज्यव्यापी आंदोलन.राज्य सरकारने अतिवृष्टिग्रस्तांना जाहीर केलेले पॅकेज ३१,६०० कोटींचे असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात जुन्याच अनेक योजनांची बेरीज करून सरकारने हा आकडा फुगविला आहे. प्रत्यक्षात केवळ ६,५०० कोटी इतकीच रक्कम सरकारने नव्याने दिलेली आहे. शेतकरी कर्जमुक्तीचे दिलेले आश्वासनही सरकारने पाळलेले नाही. शेतकऱ्यांचा यामुळे मोठा विश्वासघात झाला आहे. दीपावलीनंतर या प्रश्नावर मोठे राज्यव्यापी आंदोलन उभे करण्याचा निर्णय किसान सभेने घेतला आहे..विविध मागण्यांसाठी सोयाबीन ओतून आंदोलन करणारअतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीला भरपाईत वाढ करून किमान ५० हजार रुपये प्रति एकरी मदत द्या, शेतमजुरांचा रोजगार बुडाल्यामुळे त्यांना भरपाई म्हणून ३० हजार रुपये द्या, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करा, शेतकऱ्यांचे होत असलेले जमीन अधिग्रहण तातडीने बंद करा, कसत असलेल्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावे करा, पीकविमा योजनेचे रद्द केलेले ट्रिगर पुन्हा सुरू करा आदी मागण्यांसाठी किसान सभेचे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. बुधवारी गावच्या चावडीवर सोयाबीन ओतून आंदोलन करण्यात येणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.