Latur News: रस्ते सुरक्षिततेसाठी निवळी (ता. लातूर) येथील विलास सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊस वाहतूक वाहनांना रिफ्लेक्टर बसवण्यात आले. या उपक्रमातून रस्त्यावरील अपघात टाळण्याचा प्रयत्न असल्याचे कारखान्याच्या वतीने सांगण्यात आले. .सध्या साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरु असून यामुळे ऊसवाहतुकीच्या वाहनांची मोठी वर्दळ रस्त्यावर आहे. अनेक वाहनांना रिफ्लेक्टर नसल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. यामुळे कारखान्याच्या वतीने रिफ्लेक्टर बसवण्याची मोहीम राबवण्यात आली..Sugarcane Transport : ‘ऊस वाहतुकीच्या वाहनांना रिफ्लेक्टरची मोहीम राबवावी’.ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर, मिनीट्रॅक्टर, बैलगाडी व हार्वेस्टर पाठीमागील बाजूस हे रिफ्लेक्टर लावण्यात आले आहेत. रात्री उसाने भरलेली वाहने रस्त्यावरून जाताना अपघात होवू नये हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे..Eknath Shinde : वारकऱ्यांना संरक्षण विमा, वारीतील वाहनांना टोल माफ; उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली माहिती.या वेळी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी सचिन राठोर व अंजली पाथरे, मुरुडचे सहायक पोलिस निरीक्षक ए. एन. उजगरे, गातेगावचे सहायक पोलिस निरीक्षक केंद्रे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. वाहनचालक व बैलगाडी चालकांनी वाहन चालवताना मोठ्या आवाजात टेप रेकॉर्डर लावू नये. .विना परवाना गाडी चालवू नये, चालकाने परवाना सोबत ठेवावा, वाहने नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावीत. मद्यपान करून वाहन चालवू नयेत, वाहन नियमानुसार रस्त्यावर उभा करावे, वाहन उभा केलेल्या ठीकाणचे लावण्यात आले दगड, फांदया वापरानंतर रस्त्यावरुन काढून टाकाव्यात आदी सूचना अधिकाऱ्यांनी चालकांना दिल्या. कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक करून सर्वांचे स्वागत केले.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.