Amravati News: विदर्भाच्या ग्रामीण संस्कृतीचा मानबिंदू असलेला शंकरपट तब्बल १११ वर्षांनंतर आपल्या जन्मस्थानी पुन्हा परतला आहे. तालुक्यातील जळका पटाचे येथे सोमवारपासून (ता. २९) विदर्भातील पहिला मानाचा शंकरपट सुरू झाला असून, विदर्भ केशरी शंकरपट मैदानाची धावपट्टी आता तीन दिवस गाजणार आहे..या ऐतिहासिक शंकरपटासाठी विदर्भासह महाराष्ट्र व इतर राज्यांतील नामवंत बैलजोड्या दाखल झाल्या आहेत. शेतकरी, पटशौकिन आणि ग्रामस्थांमध्ये मोठा उत्साह असून, ग्रामीण क्रीडासंस्कृतीचा सोहळा अनुभवण्याची संधी मिळणार आहे..Traditional Storage: फळे आणि भाजीपाला साठवणुकीच्या पारंपरिक पद्धती.ग्रामपंचायत जळका पटाचे अंतर्गत मौजा जळका पटाचे येथील शेत गट क्रमांक २१५ ही ई-वर्ग जमीन ग्रामसभेच्या एकमताने आजीवन शंकरपटासाठी आरक्षित करण्यात आली आहे. गावाच्या नावाशी आणि परंपरेशी नाळ जोडणारा शंकरपट गावातच भरवावा, या भूमिकेतून हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला..Diwali Forts Tradition : दिवाळीत महाराष्ट्राची शान असलेले गड-किल्ले का बनवले जातात?.शंकरपटाचे आयोजन व नियोजनाची जबाबदारी गावातीलच श्री गजानन कृषी गट यांच्याकडे देण्यात आली असून, ही जमीन त्यांना ९९ वर्षांच्या लीजवर देण्यात आली आहे. २९ ते ३१ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या या जंगी शंकरपटाचा संपूर्ण खर्च आयोजक संस्थेकडून उचलण्यात येणार आहे. अशोक घारफळकर यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. आशिष सालणकर यांच्या अध्यक्षतेत आयोजन समितीशंकरपट यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहे..ब्रिटिशकालीन परंपरेचा वारसाजळका पटाचे येथील शंकरपटाची परंपरा ब्रिटिशकालीन सी. पी. अँड बेरार काळातील असून, विदर्भातील पहिल्या शंकरपटाची सुरुवात याच गावातून झाली होती. त्यामुळेच या गावाला ‘जळका पटाचे’ हे नाव लाभले. मात्र काही कारणांमुळे सुमारे १११ वर्षांपूर्वी हा मानाचा पट बंद पडून तळेगाव दशासर परिसरात गेला होता..“हा शंकरपट पुन्हा गावात सुरू होणे ही जळका पटाचेसाठी अभिमानाची आणि स्वाभिमानाची बाब आहे.”पराग राऊत, सरपंच, जळका पटाचे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.