Nagpur News: राज्यात विशेषतः विदर्भात वन्यप्राण्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून याचा थेट फटका शेतकरी, शेतमजूर व आदिवासी वस्त्यांना बसत आहे. या गंभीर परिस्थितीकडे शासन व वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत शेतकरी संघटना (रघुनाथदादा पाटील प्रणीत) विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर यांनी नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ठोस व तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली..कौठकर म्हणाले की, राज्यात वन्यप्राण्यांमुळे होणारे कृषी नुकसान हे आता केवळ आर्थिक प्रश्न राहिला नसून ग्रामीण जीवनासाठी गंभीर संकट बनले आहे. शासनाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार दरवर्षी हजारो कोटी रुपयांचे पीक नुकसान नोंदवले जात असून प्रत्यक्षात हे नुकसान याहून अधिक आहे. विदर्भातील अकोला, बुलढाणा, अमरावती, वर्धा आदी जिल्ह्यांत नीलगाय, रानडुक्कर, हरिण, वानर तसेच काही भागांत हिंसक प्राण्यांमुळे शेतकऱ्यांची पिके अक्षरशः उद्ध्वस्त होत आहेत..Maharashtra Wildlife 2026: चिंकारांमुळे कळसला माळरानांच्या सौंदर्यात भर.अकोला जिल्ह्यातील अनेक गावांत २०१६–१७ मध्ये ३२१८ शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्या बदल्यात १.१७ कोटी रुपयांची दिलेली नुकसानभरपाई अत्यल्प होती. कौठकर यांनी शासनाकडे ठोस मागण्या मांडताना सांगितले की, वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत मानवजीवनाच्या सुरक्षेसाठी जे अधिकार वन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, .Wildlife Attack: वन्यप्राण्यांचे हल्ले तातडीने रोखा: कौठकर.त्यांचा प्रभावी वापर करण्यात यावा. हिंसक व उपद्रवी प्राण्यांवर नियंत्रणासाठी आवश्यक ते आदेश तातडीने दिले जावेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वन्यप्राण्यांच्या हालचालींवर सतत नजर ठेवण्यासाठी विशेष योजना राबवाव्यात. तसेच जंगलालगतच्या शेती भागात मजबूत संरक्षक कुंपण, सौर कुंपण व भिंती उभारून प्राणी शेतात शिरणार नाहीत याची व्यवस्था करावी..पत्रकार परिषदेला शेतकरी संघटनेचे अफजल बरकत भास्कर, मोहन खिरोळकर, गोपाल निमकंडे उपस्थित होते. मागण्यांची दखल न घेण्यात आल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला..विशेष मदतीच्या पॅकेजची मागणीयासोबतच नुकसानभरपाईची प्रक्रिया सुलभ करून ती तातडीने व वास्तव नुकसानीनुसार देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचा विचार करून विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.